पोलीस कर्मचा-यांनी वाचवले ज्येष्ठ नागरिकाचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 07:49 PM2018-08-17T19:49:53+5:302018-08-17T20:04:29+5:30

वानवडी परिसरात बेशुध्द अवस्थेत पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाला तात्काळ रुग्णालयात नेवून वानवडी बाजार पोलीस चौकीच्या कर्मचा-यांनी वृद्धाचे प्राण वाचवले.

saved life of the senior citizen by police | पोलीस कर्मचा-यांनी वाचवले ज्येष्ठ नागरिकाचे प्राण

पोलीस कर्मचा-यांनी वाचवले ज्येष्ठ नागरिकाचे प्राण

Next
ठळक मुद्देसंबंधित पोलीस कर्मचा-यांनी केस पेपर काढून त्यांना रुग्णालयात केले दाखल

पुणे : वानवडी परिसरात बेशुध्द अवस्थेत पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाला तत्काळ रुग्णालयात नेवून वानवडी बाजार पोलीस चौकीच्या कर्मचा-यांनी वृद्धाचे प्राण वाचवले. इतकेच नव्हे तर नातेवाईकांची माहिती नसल्याने कर्मचा-यांनी स्वत:हून केस पेपर काढुन त्याला रुग्णालयात दाखल केले. 
   हेमंत हनुमंत तारे (वय ५८,किरण सोसायटी, सहकारनगर) हे बेशुध्दावस्थेत पडलेले होते. तारे व्यक्ती घरातून बेपत्ता झाल्याने त्यासंदर्भात पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी ज्ञानदेव गिरमकर व कैलास माळकर यांना पोलीस नियंत्रण कक्षातून डीफेन्स कॉलनी येथील पाण्याच्या टाकी जवळ एक व्यक्ती बेशुध्द अवस्थेत पडलेला आढळल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार देघांनी तेथे धाव घेतली. तेथे त्यांना तारे बेशुध्दावस्थेत पडलेले आढळले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांच जीव वाचविण्यासाठी तात्काळ १०८ नंबरला कॉल करून रुग्णवाहिका मागवली. त्यांना ससून रुग्णलयात दाखल केले असता, नातेवाईक नसल्याने डॉक्टरांनी केसपेपर काढावा लागेल असले सांगितले. यावर संबंधित पोलीस कर्मचा-यांनी केस पेपर काढून त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर औषधोपचार सुरू केल्यावर संबंधित व्यक्ती संदर्भात सहकारनगर येथे मिसिंग दाखल असल्याचे समजले. दरम्यान, त्यांच्या नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली. त्यामुळे तारे यांच्या नातेवाईकांनी वानवडी बाजार चौकीत येऊन पोलिसांचे अभार मानले. पोलिसांना मिठाई व पुष्पगुच्छ देऊन नातेवाईकांनी आनंद साजरा केला. 

Web Title: saved life of the senior citizen by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.