गांधी हत्येशी सावरकरांचा दुरान्वये संबंध नाही : शेषराव मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:45 PM2018-04-25T13:45:06+5:302018-04-25T13:45:06+5:30

न्यायालयाचा निकाल लोकशाहीत अंतिम मानला जातो. असे असतानाही सावरकरांचे गांधी, नेहरू परिवार व काँग्रेसशी असलेले संबंध समजून न घेता त्यांच्या बदनामीची मोहिम अद्यापही का सुरू आहे? असा प्रश्न पडतो.

Savarkar no relation with Gandhi murder case : Sheshrao More | गांधी हत्येशी सावरकरांचा दुरान्वये संबंध नाही : शेषराव मोरे

गांधी हत्येशी सावरकरांचा दुरान्वये संबंध नाही : शेषराव मोरे

Next
ठळक मुद्देसावरकरांची भूमिका गांधी अथवा काँग्रेसविरोधी नव्हती हे अनेक पत्रातून स्पष्टमृत्यूनंतरही स्वातंत्र्यवीरांची होत असलेली बदनामी माझ्या मनाला पटत नाही.

पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या विचारात राष्ट्रभक्ती व राष्ट्रहित होते. हे आपण कधी समजून घेणार आहोत की नाही? सावकरांच्या विचारात देशभक्ती असेल, तर महात्मा गांधी यांच्या सारख्या व्यक्तीची हत्या करून स्वत:ला कलंकित करण्याची त्यांना इच्छा होती का? गांधीजींच्या विचारांचे समर्थन करणारे सावरकर गांधी हत्याकांडात सहभागी तरी होतील का? महात्मा गांधी हत्या प्रकरणात सावरकरांचा दुरान्वये देखील संबंध नव्हता. न्यायालयातही तेच सिद्ध झाले. त्यामुळेच त्यांची निर्दोष मुक्तता झाली. मात्र सावरकरांची अव्याहत बदनामी सुरू ठेवणाऱ्यांना आणखी कोणते पुरावे द्यावेत? असा खडा सवाल ज्येष्ठ विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांनी मंगळवारी सावरकर विरोधकांसमोर उपस्थित केला. 
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे टिळक स्मारक मंदिरात आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या १४४ व्या ज्ञानसत्रात प्रा. मोरे यांनी चौथे पुष्प गुंफले. कै. म.म.दत्तो वामन पोतदार स्मृती व्याख्यानात ‘गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी’ या विषयावर त्यांनी विचार व्यक्त केले.     
न्यायालयाचा निकाल लोकशाहीत अंतिम मानला जातो. असे असतानाही सावरकर- गांधी, सावरकर-नेहरू, सावरकर-कॉँग्रेस संबंध न समजून घेता सावरकरांच्या बदनामीची मोहिम अद्यापही का सुरू आहे? असा प्रश्न उपस्थित करीत प्रा. मोरे म्हणाले, सावरकरांची भूमिका गांधी अथवा काँग्रेसविरोधी नव्हती, तर समर्थनाची होती. हे सावरकरांच्या अनेक पत्रातून स्पष्ट होते. गांधी हत्याकांडात सावकरांचा सहभाग होता अशी एकमेव साक्ष दिगंबर बडगे यांनी दिली होती. त्यात अनेक तफावती आहेत. कपूर आयोगानेही गांधी हत्येसंदर्भात जे निष्कर्ष काढले आहेत ते निराधार व बेकायदेशीर आहेत. कारण बडगे हे एकमेव साक्षीदार असताना कपूर आयोगाने एकदाही बडगे यांची साक्ष घेतली नाही. ही गोष्ट गंभीर आहे. सावरकरांची गांधीजींविषयीची भूमिका, न्यायालयात सादर झालेले पुरावे, तर्क वितर्क आदी सर्व बाबींचा विचार करता गांधी हत्येत सावकरांचा दुरान्वये संबंध नव्हता हेच सिद्ध होते. त्यामुळेच मृत्यूनंतरही स्वातंत्र्यवीरांची होत असलेली बदनामी माझ्या मनाला पटली नाही. सावरकरांच्या बदनामीच्या मोहिमेत सत्यता नाही म्हणून सावरकरांची खरी बाजू पुस्तकांच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न केला. 

Web Title: Savarkar no relation with Gandhi murder case : Sheshrao More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.