पुणे महापालिकेच्या आयुक्त पदावर सौरभ राव तर जिल्हाधिकारी पदावर नवल किशोर राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 01:17 PM2018-04-16T13:17:51+5:302018-04-16T13:17:51+5:30

महापालिकेच्या आयुक्त पदावर सौरभ राव यांची तर जिल्हाधिकारी म्हणून नवल किशोर राम यांची नियुक्ती झाली आहे. राव यापूर्वी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत तर नवल किशोर राम हे औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते .

Saurabh Rao become new pmc commissioner, Navalkishor Ram become collector | पुणे महापालिकेच्या आयुक्त पदावर सौरभ राव तर जिल्हाधिकारी पदावर नवल किशोर राम

पुणे महापालिकेच्या आयुक्त पदावर सौरभ राव तर जिल्हाधिकारी पदावर नवल किशोर राम

googlenewsNext
ठळक मुद्दे पुण्याच्या आयुक्तपदी सौरभ राव, यापूर्वी पुण्याच्याच जिल्हाधिकारी पदावर कार्यरत जिल्हाधिकारी पदावर नवल किशोर राम, यापूर्वी औरंगाबादच्या जिल्हाधिकारी पदावर कार्यरत

पुणे :  पुणे महापालिकेच्या आयुक्त पदावर सौरभ राव यांची तर जिल्हाधिकारी म्हणून नवल किशोर राम यांची नियुक्ती झाली आहे. राव यापूर्वी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते तर नवल किशोर राम हे औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते . महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची पदोन्नतीवर  केंद्रात बदली झाली बदली झाली होती. मात्र, त्यांनी पंधरा दिवसांपहून अधिक काळ पदभार सोडल नव्हता. ५ एप्रिल रोजी त्यांनी पदभार सोडला. तेव्हापासून अतिरिक्त आयुत शितल उगले हे  प्रभारी आयुक्तपदी होत्या. नवनियुक्त आयुक्त  सौरभ राव यांचा पुणे जिल्हाधिकारी पदावरील प्रशासकीय कार्यकाळ एक वर्षापूर्वीच पूर्ण झाला होता. मात्र, पुरंदर आंतरराष्ट्रीय  विमानतळाचे काम मार्गी लावण्यासाठी त्यांना कार्यकाळ वाढवून देण्यात येण्याची चर्चा होती. राव यांनी आपल्या कार्यकाळात माळीणच्या पुनर्वसनाचा प्रश्न यशस्वीपणे हाताळला. त्याचप्रमाणे आंतराराष्ट्रीय विमानतळालाही गती दिली. त्यांच्या नावाची आयुक्तपदासाठी अनेक महिन्यांपासून चर्चा होती.

Web Title: Saurabh Rao become new pmc commissioner, Navalkishor Ram become collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.