आयुष्याला प्रतिसाद द्यावा : संजय उपाध्ये; गोविंदस्वामी आफळे जन्मशताब्दी कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:38 PM2018-02-09T12:38:10+5:302018-02-09T12:48:43+5:30

परंपरांमध्ये जगताना काळानुसार वर्तमानातील बदल आचरणात आणायला हवेत. स्वत:च्या उणिवांवर सतत चर्चा करण्यामुळे आत्मविश्वास कमी होईल. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रतिसादाचा ठेवा, असे प्रतिपादन व्याख्याते डॉ. संजय उपाध्ये यांनी केले. 

Sanjay Upadhye speaks on life; Program in Pune | आयुष्याला प्रतिसाद द्यावा : संजय उपाध्ये; गोविंदस्वामी आफळे जन्मशताब्दी कार्यक्रम

आयुष्याला प्रतिसाद द्यावा : संजय उपाध्ये; गोविंदस्वामी आफळे जन्मशताब्दी कार्यक्रम

googlenewsNext
ठळक मुद्दे'जिंकलो ऐसे म्हणा' या विषयावर डॉ. संजय उपाध्ये यांनी केले उपस्थितांना मार्गदर्शनजो जिंकतो तोच जगण्याची प्रवृत्ती कायम ठेवतो : संजय उपाध्ये

पुणे : परंपरांमध्ये जगताना काळानुसार वर्तमानातील बदल आचरणात आणायला हवेत. स्वत:च्या उणिवांवर सतत चर्चा करण्यामुळे आत्मविश्वास कमी होईल. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रतिसादाचा ठेवा, असे प्रतिपादन व्याख्याते डॉ. संजय उपाध्ये यांनी केले. 
आफळे अकादमीतर्फे राष्ट्रीय कीर्तनसम्राट गोविंदस्वामी आफळे यांच्या जन्मशताब्दी सांगता समारंभानिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी त्यांनी 'जिंकलो ऐसे म्हणा' या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. शुभांगी आफळे, मधुरा आफळे, क्रांतिगीता महाबळ आदी मान्यवर उपस्थित होते. 
या वेळी युवा कीर्तनकार वज्रांग आफळे यांचे कीर्तन झाले. 
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, ‘जीवन जगत असताना सतत जिंकण्याचा विचार मनात आणा. जो जिंकतो तोच जगण्याची प्रवृत्ती कायम ठेवतो. भूतकाळ बदलता येत नाही, भविष्यकाळ माहिती नाही; त्यामुळे वर्तमानात जगा. प्रत्येक नवीन चूक हे प्रगतीचे लक्षण आहे.’

Web Title: Sanjay Upadhye speaks on life; Program in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे