नदीजोड प्रकल्प : कामगारांची सुरक्षा सांभाळावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 01:07 AM2018-09-23T01:07:05+5:302018-09-23T01:07:26+5:30

अकोले येथे सुरू असलेल्या नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या कामातील अपघाती घटना दिवसेंदिवस वाढत असून मागील आठवड्यात एका कामगाराचा मृत्यू झाल्याने प्रकल्पाचे काम करणाऱ्या सोमा कंपनीला कामाच्या हिताबरोबरच कामगारांच्या जिवाची सुरक्षा सांभाळावी लागणार आहे

The safety of the workers will be maintained | नदीजोड प्रकल्प : कामगारांची सुरक्षा सांभाळावी लागणार

नदीजोड प्रकल्प : कामगारांची सुरक्षा सांभाळावी लागणार

Next

अकोले - येथे सुरू असलेल्या नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या कामातील अपघाती घटना दिवसेंदिवस वाढत असून मागील आठवड्यात एका कामगाराचा मृत्यू झाल्याने प्रकल्पाचे काम करणाऱ्या सोमा कंपनीला कामाच्या हिताबरोबरच कामगारांच्या जिवाची सुरक्षा सांभाळावी लागणार आहे, तरच कामगारांच्या जिवावर प्रकल्पाचे काम जलदगतीने पूर्ण होऊ शकणार आहे.
गेल्या वर्षी दि. २० नोव्हेंबरला अकोले येथील पाच नंबर शॉप्टच्या ठिकाणी दोनशे फुटांवर क्रेन तुटून आठ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात चर्चेत आला होता. त्यामुळे अनेक संघटना आणि ग्रामस्थांनी दोन महिने अकोले येथील नदीजोड प्रकल्पाच्या पाच नंबर शॉप्टचे काम बंद पाडले होते. या घटनेनंतर अपघाताच्या घटना थांबल्या नसून अनेक कामगारांनागंभीर दुखापतीच्या घटना घडल्या आहेत. तसेच काही कामगारांना जीवही गमवावा लागला आहे.
काम करण्यासाठी लागणारा कामगार स्थानिकपेक्षा परप्रांतीय असल्याने घडलेल्या किरकोळ घटना लोकांपर्यंत समजत नसल्याचे येथील काम करणाºया लोकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. सध्या काझड हद्दीतील चार नंबर शॉप्टच्या ठिकाणी जमिनीपासून २४० फूट खाली खोदकाम सुरू असून या ठिकाणी दक्षिण ते उत्तर दिशेला पाचशे मीटरपर्यंत खोदाई सुरू आहे. याच प्रमाणात भादलवाडी हद्दीतदेखील खोदाई सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याच्या या कामगारांच्या सुरक्षेबरोबरच स्थानिक लोकांनी राहत्या घराला हादरे बसत असल्याच्याही तक्रारी केल्या असून प्रकल्प पूर्ण होईपर्यंत अनेक समस्यांना काम करणाºया कंपनीला तोंड द्यावे लागणार आहे.

डोक्यात दगड पडून मृत्यू
मागील आठवड्यात पुरुषोत्तमसिंग राममनोहरसिंग गौड (वय ३३, रा. बमराह वॉर्ड १९ चेनागिडी, जि. देवधरी, मध्य प्रदेश) या व्यक्तीच्या डोक्यात दगड पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चार नंबर ठिकाणी एका कामगाराला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे अजून नदीजोड प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी चार ते पाच वर्षांचा कालावधी लागू शकतो, तोपर्यंत किती लोकांना जीव गमवावा लागेल, याची पर्वा ठेकेदारांना नाही.

Web Title: The safety of the workers will be maintained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.