’सेफ जर्नी’ मराठी वेबसीरिज मधून मिळणार लैंगिक शिक्षणाचे धडे 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 12:51 PM2019-04-09T12:51:13+5:302019-04-09T12:51:31+5:30

ब-याचदा शरीर संबंध, एचआयव्ही किंवा नैराश्यातून उदभवणा-या लैंगिक समस्या या संदर्भात वरवरची माहिती तरुण पिढीला मिळते.

'Safe Journey' Lessons From Gender Secrets to Sex Education | ’सेफ जर्नी’ मराठी वेबसीरिज मधून मिळणार लैंगिक शिक्षणाचे धडे 

’सेफ जर्नी’ मराठी वेबसीरिज मधून मिळणार लैंगिक शिक्षणाचे धडे 

googlenewsNext

- नम्रता फडणीस
पुणे :   लैंगिक आरोग्याचे शास्त्रशुद्ध ज्ञान तरुणपिढीला मिळतेच असे नाही. ब-याचदा शरीर संबंध, एचआयव्ही किंवा नैराश्यातून उदभवणा-या लैंगिक समस्या या संदर्भात वरवरची माहिती तरुण पिढीला मिळते. स्वत:ला जाणवणा-या समस्या कुणाला तरी सांगायच्या आहेत; पण कुणी त्या शांतपणे ऐकून घेईल असे त्यांना वाटत नाही. यातून गुंता वाढून मानसिक ताणतणावांना सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी प्रयास हेल्थ ग्रुप या स्वयंसेवी संस्थेने (पीएचजी) दोन वर्षे केलेल्या संशोधनातून   ‘सेफ जर्नीज’ या मराठी वेबसीरिज निर्मित केली आहे.  ‘इंफोटेन्मेंट’च्या  वेगळ्या प्रयोगाद्वारे युवापिढीला ‘सेफ जर्नी’चा सल्ला देण्यात आला आहे. 
अविवाहित तरूण-तरूणींचे लैंगिक आरोग्य आणि त्यांच्या गरजा जाणून घेण्यासाठी  प्रयास हेल्थ ग्रृप ( पीएचजी) 2017 मध्ये  संशोधनाचे काम हाती घेतले. त्यातून समोर आलेल्या निवडक विषयांवर ही वेबसिरीज तयार करण्यात आली आहे.  विशेष म्हणजे, सोशल मीडियावर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिरीजच्या पहिल्या भागाला तरूणाईकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. 
    ’सेफ जर्नीज’ मध्ये लैंगिकता आणि लैंगिक आरोग्याशी निगडित 8 विविध विषयांवरच्या माहितीपर शॉर्ट फिल्मसचा समावेश आहे. यामध्ये सुरक्षित संभोग, हस्तमैथून, पॉर्नचे व्यसन, निर्णयक्षमता, मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांना असलेली पाठिंब्याची गरज, अनैच्छिक मातृत्व, सकारात्मक स्वप्रतिमा, लहान मुलांचे लैंगिक शोषण आणि मान्यता याविषयांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तरूणाईला लैंगिकतेशी निगडित भेडसावणारे प्रश्न आणि आरोग्य दृष्टीकोनातून त्याचा स्वीकार करण्याची असलेली गरज यावर भाष्य करण्यात आले आहे. यासंदर्भात प्रयास हेल्थ ग्रृपच्या रितु यांच्याशी  ‘लोकमत’ने संवाद साधला. त्या म्हणाल्या, पीएचजीने 20 ते 29 वयोवर्ष गटातील जवळपास 1240 अविवाहित मुलांशी संवाद साधून त्यांचे लैंगिक आरोग्य जाणून घ्यायचा प्रयत्न केला. दोन वर्षांपूर्वी संस्थेने सुरू केलला संशोधनात्मक प्रकल्प आता अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. लवकरच आम्ही त्याचे निष्कर्ष जाहीर करणार आहोत.त्या गोष्टी चांगल्या किंवा वाईट याबाबत कोणत्याही न्यायिकतेच्या भूमिकेत न जाता आम्ही वास्तववादी निष्कर्षाची मांडणी करणार आहोत. या वेबसिरीजमधील दोन शॉर्ट फिल्म्स अनुक्रमे अलोक राजवाडे आणि वरूण नार्वेकर यांनी तर 4 फिल्म्स अनुपम बर्वे यांनी दिग्दर्शित केल्या आहेत. यामध्ये सुवर्त जोशी, पर्ण पेठे, अक्षय टांकसाळे, शिवानी रंगोले यांनी भूमिका केल्या आहेत. अलोक राजवाडे आणि मृण्मयी गोडबोले हे संवादकाच्या भूमिकेत आहेत. 
.....
’’ लैंगिकतेबददल खुलेपणाने बोलले जात नाही. एखादा मुलाची देहबोली बायकी  किंवा मुलीची पुरूषी असेल तर त्यांच्यावर टिका केली जाते. प्रयास संस्थेने केलेल्या संशोधनातून काही विषय समोर आल्यानंतर त्यावर तू शॉर्टफिल्म करशील का? अशी मला विचारणा झाली. त्यातून 5 लेखक आणि संशोधक तज्ञांच्या मदतीने आम्ही 8 संहिता तयार केल्या. त्याचा पहिला भाग नुकताच सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे. 
- अनुपम बर्वे, दिग्दर्शक
 

Web Title: 'Safe Journey' Lessons From Gender Secrets to Sex Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.