जन्माने रशियन, धर्माने ख्रिश्चन तरीही गणेशभक्त; पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 02:03 AM2018-09-14T02:03:04+5:302018-09-14T02:03:36+5:30

रशियन व भारतीय संस्कृतीचा अनोखा मिलाफ

Russian born, a Christian by religion is still a Ganesh devotee; Establishment of eco-friendly Ganesh idol | जन्माने रशियन, धर्माने ख्रिश्चन तरीही गणेशभक्त; पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना

जन्माने रशियन, धर्माने ख्रिश्चन तरीही गणेशभक्त; पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना

Next

जेजुरी : रशिया आणि भारत दोन संस्कृतींची दोन टोके, मात्र गणेशाने ती एकत्र आणलीत... जेजुरीतील एका कुटुंबात. होय रशियाची मरिअण्णा समोवारोवा २५ वर्षांपूर्वी येथील एक शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक आबनावे यांच्याशी विवाह करून भारतात आली. धार्मिक वृत्तीची मरिअण्णा इथल्या सण उत्सवात रमली. हिंदूंचे सर्व सण भक्तिभावाने साजरी करू लागली. दरवर्षीचा गणेशोत्सव तिचा अत्यंत प्रिय सण, कारण ही तसेच मातीतून निर्माण झालेला गणेश, त्याचे मूलतत्त्व मातीचेच असल्याने स्वत: मातीचाच गणेश बनवून त्याची भक्तीभावाने स्थापना करू लागली.
गणेशोत्सव आला की मरिअण्णांची मातीची गणेशमूतीर्ची बनवण्याची लगबग सुरू होते. घरच्या परसबागेतील पोयट्याची माती घेऊन त्या स्वत:च गणरायाची मूर्ती बनवतात. कला शाखेच्या पदवीधर असल्याने अत्यंत सुबक आणि रेखीव अशी मूर्ती बनवण्याचे त्यांचे कसब वाखाणण्यासारखे आहे. त्यांचे पाहून त्यांची दोन्ही मुले निमार्लानुराग आणि युगंधराही मूर्ती बनवू लागले. यात पतीही सहभाग घेऊ लागले. पर्यावरणपूरक असा इको फ्रेंडली गणेशाची स्थापना दरवर्षी होऊ लागली. २५ वर्षांपासून सुरू झालेला हा प्रवास आज ही सुरूच आहे.
आज मरिअण्णाच्या घरात गणेशाची स्थापना झाली. गणेश अथर्वशीर्ष, गणपतिस्तोत्र,
आरती करून तिने आपल्या कुटुंबासमवेत गणरायाची स्थापना केली. इंग्रजी, रशियन आणि हिंदी बोलणाऱ्या मरिअण्णा मराठीही बोलू शकतात. आरतीनंतर त्यांनी आपल्या पतीसमवेत एक झकास उखाणाही घेतला.
मातीचेच मूलतत्त्व असणाºया गणेशाची मूर्ती मातीपासून मूर्ती बनवावी. याच मूर्तीत चैतन्य असते असा त्यांचा विश्वास असून सर्वांनी प्रदूषणमुक्त उत्सव साजरा करण्यासाठी त्यांचा आग्रह आहे. मरिअण्णा यांची प्रेरणा घेत अनेकांनी इको फ्रेंडली गणेशाची स्थापना करण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Russian born, a Christian by religion is still a Ganesh devotee; Establishment of eco-friendly Ganesh idol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.