- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी पाचवी लॉटरी शनिवारी काढली जाणार आहे. चौथ्या फेरीत ८४९ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते. त्यांपैकी केवळ ३०९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.
उर्वरित प्रवेशासाठी शनिवारी लॉटरी काढण्यात येणार आहे. पुण्यात ८४९ शाळांमध्ये १५ हजार ६९३ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी ३६ हजार ९३३ अर्ज आले होते. चौथ्या फेरीच्या अखेरीस ९ हजार ९५६ जागा भरल्या आहेत. पुण्यात दोनशेहून अधिक अशा शाळांसाठी अर्ज आलेले नाहीत. काही ठाराविक शाळांसाठीच अर्ज आले असून, त्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात आले आहेत.