रोटी घाट झाला तुकोबामय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 09:46 PM2018-07-12T21:46:35+5:302018-07-12T21:46:50+5:30

गेल्या पंधरवड्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने रोटी घाट हिरवागार झाला होता. काहीसे ढगाळ आणि ऊन असे दुहेरी वातावरण त्यातच संत तुकाराम महाराज पालखीचे घाटात झालेले आगमन यामुळे रोटी घाटात एक आगळे वेगळे धार्मिक चैतन्य निर्माण झाले होते.

Roti Ghat Tukobamay ... | रोटी घाट झाला तुकोबामय...

रोटी घाट झाला तुकोबामय...

googlenewsNext
ठळक मुद्देसाधारणत: दोन तासांच्या जवळपास पालखीने रोटी घाट पार

पाटस : पाटस-रोटी वळण घाटातून मजलदरमजल करीत जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने दिड किलोमीटरचा चढतीचा घाट पार केला. यावेळी टाळ मृदंग , ज्ञानेश्वर माऊली तुकाराम या जयघोषाने अवघा घाट दुमदुमला होता.
साधारणत: दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पालखी रोटी घाटाच्या पायथ्याशी आली. जसाजसा पालखी रथ घाटातील रस्त्यानेवर जात होता. तसतसे वारकरी भक्त टाळ मृदंगाच्या गाच्या निनादात बेफाम नाचत होते. त्यानंतर पायथ्याशी वारकरी भक्तांचा जथा एकत्रित येऊन घाटाचा चढतीचा काही भाग बेफामपणे पळत पार करीत होते. साधारणत: दोन तासांच्या जवळपास पालखीने रोटी घाट पार केला होता. 
गेल्या पंधरवड्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने रोटी घाट हिरवागार झाला होता. काहीसे ढगाळ आणि ऊन असे दुहेरी वातावरण त्यातच संत तुकाराम महाराज पालखीचे घाटात झालेले आगमन यामुळे रोटी घाटात एक आगळे वेगळे धार्मिक चैतन्य निर्माण झाले होते. महिला वारकरी भक्तांच्या डोक्यावर तुळशाी वृंदावन तर काही महिला डोक्यांवर विठ्ठल रुक्मिणींची मुर्ती घेऊन घाट पार करीत होत्या. महिला आणि पुरुषांच्या फुगड्या विविध सामाजिक प्रबोधनाच्या दिंड्या आणि या दिंड्यातील फलक भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. 
काही महिला डोक्यांवर विठ्ठल रुक्मिणींची मुर्ती घेऊन घाट पार करीत होत्या. महिला आणि पुरुषांच्या फुगड्या विविध सामाजिक प्रबोधनाच्या दिंड्या आणि या दिंड्यातील फलक भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. 
.............
वरवंड (ता.दौैंड) येथील मुक्कामानंतर पालखी मजलदरमजल करीत पाटस येथे आली. यावेळी सरपंच वैैजयंता म्हस्के, उपसरपंचा आशा शितोळे, जिल्हा परिषद सदस्या सारिका पानसरे, पंचायत समिती सदस्या आशा शितोळे यांच्यासह ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. 
अशोक गुजर यांनी पालखी मार्गावर नयनमनोहरी रांगोळ्या काढल्या होत्या. तर परंपरेप्रमाणे दिवंगत कमलाकर देशपांडे यांच्या कुटुंबियांकडे पालखीला मानाचा नैैवेद्य होता. तर ग्रामस्थांच्या वतीने वारकरी भक्तांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. 
 नागेश्वर मंदिरात पालखी विसाव्यासाठी होती. यावेळी पंचक्रोशीतील भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले आणि नंतर पुढे पालखीचे रोटी घाटाकडे प्रस्थान झाले.

Web Title: Roti Ghat Tukobamay ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.