सहा महिने रखडले रस्त्याचे काम , खड्ड्यांतून रस्ता शोधताना वाहनचालकांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 05:21 AM2017-11-09T05:21:23+5:302017-11-09T05:21:52+5:30

डीआयएटी पासून गो-हे गावच्या हद्दीतील सिंहगड रस्त्यासाठी निधी असूनही केवळ प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे रस्त्याचे काम निकृष्ट आणि अपूर्ण झाले

Road work for six months, driving drivers in search of a road through potholes | सहा महिने रखडले रस्त्याचे काम , खड्ड्यांतून रस्ता शोधताना वाहनचालकांची दमछाक

सहा महिने रखडले रस्त्याचे काम , खड्ड्यांतून रस्ता शोधताना वाहनचालकांची दमछाक

खडकवासला : डीआयएटी पासून गो-हे गावच्या हद्दीतील सिंहगड रस्त्यासाठी निधी असूनही केवळ प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे रस्त्याचे काम निकृष्ट आणि अपूर्ण झाले असून सहा महिन्यापासून रेंगाळलेल्या या कामासाठी मुहूर्त मिळालेला नाही. येथील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमधून वाट शोधण्यात वाहन चालकांची दमछाक होत आहे.
सुमारे एक कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन मंडळाच्या फंडातून या रस्त्यासाठी मंजूर होउन एक वर्ष झाले. डीआयएटीच्या गेट पासून ७०० मीटर रस्ता गोºहेच्या पंचशीलनगरपर्यंत येतो. प्रत्यक्षात या कामासाठी जून उजाडला. हे काम करताना खडीकरण पूर्ण रस्त्यावर केले नाही. काही ठिकाणी जुन्या रस्त्यावर कार्पेट केले गेले. सिलकोटचे काम पावसाची सुरवात झाल्यामुळे करताच आले नाही. त्यामुळे अशा निकृष्ट व अपूर्ण झालेल्या कामावर आठवड्यात खड्डे पडले. खड्ड्यांबरोबर उखडलेली खडी रस्त्यावर पसरली. अशा रस्त्यावरून दुचाकी चालवणे म्हणजे जीवावर उदार होऊनच चालवणे. पूर्वीपेक्षाही या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.
डीआयएटीपासून लगेच वळण आहे. खड्डे आणि पसरलेल्या खडीवरून वाहन हमखास घसरणार. पुढे ५० मीटरच्या अंतरात एक खड्डा चुकवताना दुसºया खड्ड्यात वाहन हमखास आदळणारच. पुढे अ‍ॅक्वेरिअस आणि कोंढाणा हॉटेलपासून सावली हॉटेलसमोर तर पंचशीलनगरपर्यंत खड्डे, उखडलेला रस्ता आणि पसरलेली खडीमिश्रित वाळू, असे चित्र आहे. अशा रस्त्यावरून वाहनांचे अपघात झाले नाहीत तरच नवल!
येथे अनेक मोठे अपघातही झाले आहेत. या रस्त्याचे काम त्वरित सुरू न केल्यास शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
गोºहे गावचे सरपंच सचिन पासलकर म्हणाले, उपसरपंच सुशांत खिरीड, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रमेश कोंडे, तालुका प्रमुख नितीन वाघ यांनी कामाचा दर्जा राखून रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी निवेदन देऊन अनेकदा पाठपुरावा केला, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे आणि सहायक अभियंता नकूल रनसिंग आश्वासनांच्या पुढे गेले नाहीत.

डांबर कमी आणि निकृष्ट वापरल्याने दर्जाहिनकाम झाले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला रस्त्याच्या कामाला सुरुवात केल्यावर पावसामुळे काम खराब झाले आहे, असे म्हणून दर्जाहिन कामाची जबाबदारी टाळण्यात येते. प्रशासनाकडून अशी कामे करणाºया ठेकेदारांना अभय मिळते आणि बिलही लगेच मिळते.
- सचिन पासलकर,
सरपंच, गोºहे बुद्रुक

या कामाची मंजुरी एक वर्षांपूर्वीची असून मे महिन्यात काम सुरु केले गेले. दरम्यान पावसामुळे अर्धवट काम बंद करण्यात आले. संबंधित ठेकेदारास नोटीस देवून काम पहिल्यापासून पूर्ववत करण्यास सांगितले आहे. त्यामुळे झालेल्या कामाचे बील देण्यात आलेले नाही. आठवड्यात काम सुरू करण्यात येणार आहे.
- जयंत काकडे,
शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग हवेली.

अर्धवट झालेल्या कामामध्ये पावसामुळे खड्डे पडून उखडला आहे. हे काम पूर्ववत आठवड्यात सुरू होणार आहे. दर्जा राखून सुरुवातीपासून हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
- भीमराव तापकीर,
आमदार, खडकवासला
विधानसभा मतदारसंघ

Web Title: Road work for six months, driving drivers in search of a road through potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Potholeखड्डे