पुणे : भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल तर करतो आहे. तंत्रज्ञानानेसुद्धा नवनवीन यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. या वाटचालीत मात्र आपल्या दळणवळण आणि पाण्याच्या विविध स्रोतांची निर्मिती ही तितकीच महत्त्वपूर्ण आहे. आजच्या काळात या प्रकल्पाचा खर्च प्रचंड आहे; पण तरी विकासाच्या दृष्टीने हा नदी व रेल्वे जोड प्रकल्प अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केले.
श्री आदिशक्ती फाउंडेशनतर्फे आदिशक्ती गप्पा कट्टा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी माजी मंत्री बी. जे. खताळ, डॉ. शरद हर्डीकर, माजी कर्णधार चंदू बोर्डे, उद्योजक वालचंद संचेती, अभिनेते मोहन आगाशे, माजी पोलीस महासंचालक अजित पारसनीस, शेती व हवामान तज्ज्ञ डॉ. आर. एन. साबळे, एअर मार्शल भूषण गोखले, कृषिशास्त्रज्ञ डॉ. नारायण हेगडे, बी. यू. भंडारी उद्योग समूहाचे शैलेश भंडारी, अ‍ॅड. एन. डी. पवार, पत्रकार तुळशीराम भोईटे, पी. के. बेलसरे, आदिशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष व आयोजक दत्ता पवार आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, ‘‘माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही महापालिकेपासून केली. शैक्षणिक क्षेत्रातील संस्थांच्या निर्मितीत माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील, माजी कृषिमंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले, रामराव आदिक यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे.’’
पूर्वीचे खेळाडू देशासाठी खेळायचे, पण हल्ली पैशांचा प्रचंड प्रमाणात विचार होतो आहे, ही खंत व्यक्त केली.
अभिनेते आगाशे म्हणाले, ‘‘आपले व्यक्तिमत्त्व आणि आवाज यांतून संस्कार व्यक्त होतात. आजच्या पिढीला झटपट यशस्वी होण्याची सवय लागली आहे. यामुळे मनोरंजन क्षेत्रही जंकफूडप्रमाणे तयार होत आहे.’’

आपण राजकारणात योगायोगाने आलो. इंग्रजांच्या काळातही राज्यकर्त्यांची ज्या प्रमाणात दहशत होती, त्याचीच पुनरावृत्ती आज पाहायला मिळते आहे. मात्र, दहशतीने काही मिळत नाही. आपण जरी न्यायाधीशपदाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला, तरी राजकारणात राजकारण मिसळू दिले नाही. सत्ता कुणाचीही असली, तरी केंद्रस्थानी जनहिताचा विचार असावा.’’ बोेर्डे म्हणाले, ‘‘भारतात क्रिकेटला चांगले दिवस आले असून खेळाडू ही प्रचंड मेहनत घेताना दिसतात. अर्थात, खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीने संघनिवड समितीची जबाबदारी वाढते आहे.’’ त्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कामगिरीचेही कौतुक केले.
- बी. जे. खताळ, माजी मंत्री


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.