Retail pirate; Stressful peace in the city | पिंपरीत किरकोळ दगडफेक; शहरात तणावपूर्ण शांतता  

पिंपरी - कोरेगाव भीमा येथील वादंगाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील आंबेडकरी चळवळीतील, तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते पिंपरी चौकात सकाळपासून जमा झाले. त्यांनी घटनेचा निषेध नोंदविणाºया घोषणा दिल्या. या वेळी शहरात तणावाची स्थिती निर्माण होताच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधासाठी पिंपरी चौकात कार्यकर्त्यांनी रस्त्यातच ठिय्या मांडला. पिंपरी-चिंचवड आणि निगडी परिसरात वाहनांवर किरकोळ दगडफेकीच्या घटना घडल्या. यामध्ये पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला असून, त्यास तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. पिंपरी चौक परिसरात एकत्रित आलेल्या जमावाने आजूबाजूच्या परिसरात फिरून दुकाने, टपºया बंद ठेवण्याचे आवाहन केले. कार्यकर्ते दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत होते.

दुकानाच्या काचा फोडल्या
४चिंचवड येथे जमावाने वाहनांवर किरकोळ दगडफेक केली. पिंपरीत ग्रेड सेपरेटरमधून येणाºया टेम्पोवर संतप्त जमावाने दगडफेक केली.
४पिंपरी चौकात जमा झालेल्या तरुणांनी परत जाताना पिंपरी रेल्वे स्थानकावर दगडफेक केली. परिसरातील काही दुकानांचे नुकसान केले.
४भाटनगर, निगडी परिसरात तणावाचे वातावरण असल्याने पोलीस व्हॅन या भागात फिरत होत्या.