टेबलखुर्च्या टाकल्या काढून; बसण्यास मनाई केल्याने हवेली तहसील कार्यालयावर वकिलांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 02:32 PM2018-01-23T14:32:01+5:302018-01-23T14:35:11+5:30

पुणे येथील तहसीलदार पुणे शहर व हवेली कार्यालय अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने तहसीलदार कार्यालयात काम करणाऱ्या वकिलांना अचानकपणे त्यांच्या टेबल खुर्च्या बाहेर काढून तेथे बसण्याची मनाई केल्यानंतर घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले.

Removes tableware pots; Advocates agitation in the Tehsil office of the Haveli | टेबलखुर्च्या टाकल्या काढून; बसण्यास मनाई केल्याने हवेली तहसील कार्यालयावर वकिलांचे आंदोलन

टेबलखुर्च्या टाकल्या काढून; बसण्यास मनाई केल्याने हवेली तहसील कार्यालयावर वकिलांचे आंदोलन

Next
ठळक मुद्देशुक्रवार पेठ येथील खडकमाळ आळी येथील तहसीलदार कचेरीच्या प्रवेशद्वारापाशी आंदोलन वकिलांना अचानकपणे त्यांच्या टेबल खुर्च्या बाहेर काढून तेथे बसण्याची मनाई

पुणे : पुणे येथील तहसीलदार पुणे शहर व हवेली कार्यालय अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने तहसीलदार कार्यालयात काम करणाऱ्या वकिलांना अचानकपणे त्यांच्या टेबल खुर्च्या बाहेर काढून तेथे बसण्याची मनाई केल्यानंतर पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. मिलिंद पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शुक्रवार पेठ येथील खडकमाळ आळी येथील तहसीलदार कचेरीच्या प्रवेशद्वारापाशी घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले.
तहसीलदार पुणे शहर व हवेली कार्यालय अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशन  ही पुणे बार असोसिएशनशी सलग्न बार असोसिएशन आहे. तहसीलदार कचेरीतील एका कर्मचाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार नुकतीच कारवाई होऊन संबंधीत कर्मचारी लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडला होता व त्याला अटक झाली होती. त्या प्रकरणानंतर चिडून जाऊन या कर्मचाऱ्याने लोकायुक्तांकडून हवेली तहसीलदार कार्यालयात अतिक्रमण केल्याविरुद्ध तक्रार केली होती़ त्यांच्या आदेशानुसार तहसीलदार कचेरीत काम करणाऱ्या वकिलांच्या टेबल खुर्च्या काढून टाकण्यात आल्या.
तहसीलदार पुणे शहर व हवेली कार्यालय अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने तहसीलदार गीता दळवी यांना निवेदन देण्यात आले व आमच्या जागा आम्हाला पूर्ववत द्याव्यात व तहसीलदार कचेरीत कायदेशीर काम व वकीली व्यवसाय करायला अडथळा आणू नये़ तसे न केल्यास भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा तहसीलदार पुणे शहर व हवेली कार्यालय अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने देण्यात आला असल्याचे अ‍ॅड़ मिलिंद पवार यांनी सांगितले.
या आंदोलनात पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड मिलींद पवार, तहसीलदार पुणे शहर व हवेली कार्यालय अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या अध्यक्षा अ‍ॅड़ राजश्री रा. अडसूळ-जाधव, उपाध्यक्ष अ‍ॅड़ मच्छिंद्र नागपूरे, सचिव महेश सकट, सह-सचिव अ‍ॅड. अनिता ठाकुर, अ‍ॅड. मुरलीधर तावरे, अ‍ॅड. चक्रधर काळे, अ‍ॅड. सुभाष ओसवाल, अ‍ॅड. लक्ष्मण कांंबळे, अ‍ॅड. शमा शिंदे, अ‍ॅड. अनिल पाटील, पुणे बार असोसिएशनचे माजी सचिव अ‍ॅड. सचिन हिंगणेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Removes tableware pots; Advocates agitation in the Tehsil office of the Haveli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे