regroupement impression to builder who raped on garbage collecting girl | भंगार वेचणाऱ्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या बिल्डरला सक्तमजुरी
भंगार वेचणाऱ्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या बिल्डरला सक्तमजुरी

ठळक मुद्देवैद्यकीय पुरावे महत्वाचे मानत न्यायालयाने आरोपीला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा २२ जून २०१२ रोजी मावळ येथील वराळेत सुरू असलेल्या एका नवीन इमारतीतील घटना

पुणे : भंगार वेचणा-या चार मुलींना कोंडून ठेवत त्यातील चौदा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणा-या बांधकाम व्यावसायिकाला न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एम. एम. देशपांडे यांनी हा आदेश दिला.  
आयुब कासीम पटेल (वय ४४, रा. म्हाडा कॉलनी, तळेगाव स्टेशन, ता. मावळ) असे शिक्षा देण्यात आलेल्या बिल्डरचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीला दत्तक घेतलेल्या भावाने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. २२ जून २०१२ रोजी मावळ येथील वराळेत सुरू असलेल्या एका नवीन इमारतीत हा प्रकार घडला. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील उज्ज्वला रासकर यांनी एकूण २६ साक्षीदार तपासले. आरोपी पटेल हा बांधकाम व्यावसायिक आहे. तर पीडित मुलगी ही अनाथ असून तिला एका कुटुंबाने दत्तक घेतले आहे. घटनेच्या दिवशी पीडित मुलगी तिच्या अल्पवयीन मैत्रिणींबरोबर भंगार गोळा करण्यासाठी गेली असताना आरोपीने चौघींना जबरदस्तीने इमारतीतील पंपींग स्टेशन येथे डांबून ठेवले. घटनेच्या दिवशी आरोपीने पीडित मुलीला चौथ्या मजल्यावर नेवून तोंडात बोळा कोंबून तिच्यावर बलात्कार केला. त्यातील एक मुलगी गर्भवती असताना देखील तिच्यावर आरोपीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलींनी आरडा ओरडा केला. परंतु, हा परिसर जास्त वर्दळीचा नसल्याने त्यांच्या मदतीसाठी कोणी आले नाही. परंतु, आरोपीच्या तावडीतून सुटल्यानंतर पीडित मुलीने झालेला प्रकार घरी सांगितला. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. डांबून ठेवलेल्या मुलींपैकी एक मुलगी आरोपीला चुकवून पळून गेली होती. सहायक पोलीस निरीक्षक अमोल चौधरी यांनी गुन्ह्याचा तपास केला. अ‍ॅड. उज्ज्वला रासकर यांनी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. न्यायालयीन कामकाजात पोलीस नितीन पवार यांनी मदत केली. 

.................

साक्षीदार फितूर होऊनही पटेलला शिक्षा 
पीडित मुलीच्या मैत्रिणी खटल्यात फितूर झाल्या होत्या. मात्र, पीडित मुलीची साक्ष, वैद्यकीय पुरावे महत्वाचे मानत न्यायालयाने आरोपीला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. बांधकाम साईटवरील साहित्य चोरल्यानंतर स्वत:ला वाचविण्यासाठी मुलीने हा खोटा गुन्हा दाखल केला आहे, असा बचाव पटेल यांच्या वकिलाने केला होता. 


Web Title: regroupement impression to builder who raped on garbage collecting girl
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.