कऱ्हा नदीवरील घाटकामाला मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 01:53 AM2018-09-20T01:53:55+5:302018-09-20T01:54:19+5:30

पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडून बांधकाम खात्याला सूचना

Recognition of Ghatkam on Karah river | कऱ्हा नदीवरील घाटकामाला मान्यता

कऱ्हा नदीवरील घाटकामाला मान्यता

Next

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती यात्रा पालखी सोहळ्यासाठी कºहा नदीवर घाटाच्या कामाला पालकमंत्री गिरीश बापट यांनी मान्यता दिली आहे. गुरुवारी (दि. १९) कºहा नदीवरील पापनाश तीर्थाचीही त्यांनी पाहणी केल्याची माहिती पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य प्रकाश भोईटे यांनी दिली.
जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून वर्षाकाठी जेजुरीत खंडोबा देवाच्या आठ यात्रा भरतात. यातील सोमवती यात्रा ही अत्यंत पवित्र व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. सोमवती अमावस्येला जेजुरीत खंडोबा देवाची सोमवती यात्रा भरते. या दिवशी जेजुरी गडावरून देवाची पालखी कºहा नदीवर आणली जाते. खंडोबा व म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तींना येथे कºहा स्नान घातले जाते. हिंदू संस्कृतीनुसार या विधीला पर्वकाळ मानले जाते. या यात्रेसाठी लाखो भाविक कºहा नदीवर सहभागी होत असतात.
जेजुरीला देवदर्शनासाठी येणारे भाविक कºहा नदीवर जावून अंघोळ करून घरातील देवाच्या मूर्ती तसेच देवाचे टाक यांना कºहेच्या पाण्याने स्नान घालून कुलधर्म कुलाचाराप्रमाणे धार्मिक विधी नदीवर करीत असतात. भाविकांना अंघोळ,तसेच कुलधर्म कुलाचाराप्रमाणे धार्मिक विधी करता यावेत तसेच त्यांच्या जीविताला कोणताही धोका उदभवणार नाही यासाठी कºहा नदीवर घाट बांधून देवकार्यासाठी कुंड तसेच स्नानगृहे बांधणे आवश्यक आहे. हा परिसर एक धार्मिकस्थळाबरोबरच पर्यटन स्थळ म्हणून विकसित होवू शकेल असा प्रस्ताव पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य प्रकाश भोईटे यांनी नियोजन मंडळाकडे मांडला होता.
पालकमंत्री गिरीश बापट यांनी प्रस्तावाला मान्यता देवून सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष बाबाराजे जाधवराव, नियोजन मंडळाचे सदस्य प्रकाश भोईटे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाराम जगदाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे खालिद सलीम शेख आदींनी कºहा नदीवरील देव अंघोळीच्या परिसराची पाहणी केली.

घाटाअभावी अनेक मृत्यू
कºहा नदीवर देव अंघोळीच्या ठिकाणी पापनाश तीर्थावर घाट नसल्याने तसेच तेथे कायम पाणी नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय होते. नदी पात्रात गाळ असल्यामुळे यात्रा व गर्दी काळात भाविकांना ही जागा असुरक्षित असते. तसेच पापनाश तीर्थावर नियमित पाणी नसल्याने मोठ्या संख्येने भाविक धरण परिसरात नाझरे कॉलनी जवळील कºहा नदीच्या पाण्यात कुलधर्म कुलाचाराचे विधी करतात. मात्र याठिकाणी पाण्याची खोली जास्त असून पाण्यात अनेक मोठे खड्डे आहेत. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अंघोळीसाठी उतरलेल्या आजपर्यंत ९० हून अधिक भाविकांचा बुडून मृत्यू झाला आहे.

Web Title: Recognition of Ghatkam on Karah river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.