सहाय्यक आयुक्तांना मारहाण केल्याप्रकरणी रवींद्र धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 06:04 PM2019-02-14T18:04:21+5:302019-02-14T18:05:50+5:30

महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण करण्यात आली होती.

Ravindra Dhangekar's anticipatory bail was rejected on the basis of assault of assistant commissioners | सहाय्यक आयुक्तांना मारहाण केल्याप्रकरणी रवींद्र धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

सहाय्यक आयुक्तांना मारहाण केल्याप्रकरणी रवींद्र धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Next
ठळक मुद्देकोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

पुणे : महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्या प्रकरणी सरकारी आणि बचाव पक्षाची बाजु बुधवारी न्यायालयाने ऐकून घेतली.  गुरुवारी काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली. सत्र न्यायाधीश ए. वाय. थत्ते यांच्या न्यायालयाने धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला. त्यामुळे त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. 
सत्र न्यायाधीश ए. वाय. थत्ते यांच्या न्यायालयात धंगेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. याच प्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांना मंगळवारी न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे. याच धर्तीवर धंगेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी मागणी बचाव पक्षाचे वकील हर्षद निंबाळकर यांनी न्यायालयात केली. सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकरी वकील उज्ज्वला पवार यांनी बाजु मांडली. निंबाळकर हे भारतीय प्रशासकीय अधिकारी आहेत. धंगेकर व इतरांकडून त्यांना मारहाण झाली आहे. प्रशासकीय अधिकाºयाला मारहाण करणे गंभीर गुन्हा आहे. शिंदे व धंगेकर यांची याप्रकरणात भूमिका वेगळी असून धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन नाकारावा, अशी मागणी यावेळी पवार यांनी केली.  या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे बचाव पक्षाच्या वकील अ‍ॅड. निंबाळकर यांनी सांगितले. 

Web Title: Ravindra Dhangekar's anticipatory bail was rejected on the basis of assault of assistant commissioners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.