म्हशींचा रॅम्पवॉक, ‘कमांडो रेडा’ आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:33 AM2019-01-19T00:33:10+5:302019-01-19T00:33:23+5:30

कृषिक प्रदर्शन : काश्मीर, राजस्थान, लक्षद्वीपच्या शेतकऱ्यांना भुरळ

Rashwalk, 'Commando Reda' attraction of buffaloes | म्हशींचा रॅम्पवॉक, ‘कमांडो रेडा’ आकर्षण

म्हशींचा रॅम्पवॉक, ‘कमांडो रेडा’ आकर्षण

Next

बारामती : कृषी विकास प्रतिष्ठानच्या कृषिविज्ञान केंद्राच्या मार्फत प्रत्यक्ष ११० एकरांवर प्रयोग केलेले कृषिक कृषी व पशुपक्षी प्रदर्शन पाहण्यासाठी काश्मीर, राजस्थान, लक्षद्वीपच्या शेतकºयांनी भेट दिली.या शेतकºयांसह नेपाळ, श्रीलंकेचे बँक अधिकाºयांनी प्रदर्शनाला भेट दिली. आधुनिक शेतीविषयीचे प्रयोग यावेळी जाणुन घेतले.


म्हशींचा रॅम्पवॉक,१६०० किलो वजनाचा रेडा पाहण्यासाठी, त्याच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी शेतकºयांची झुंबड उडाली. ‘कमांडो रेडा’ ठरले आकर्षणया प्रदर्शनात सौरऊर्जेसह कमी पाण्यावर शेती, कमी खर्चाची शेती, फळबाग लागवड, लाकडाचे घर यांसह दुग्ध-उत्पादन, फळप्रक्रिया, कृषी पर्यटन आदींच्या प्रात्यक्षिके शेतकºयांच्या चर्चेचा विषय ठरली.


नारळाच्या भुश्यावर स्ट्रॉबेरी, काकडी, मिरची, टोमॅटो, वांगी अशी केलेली भाजीपाला लागवड चर्चेचा विषय ठरली. केवळ नारळाच्या करवंट्यावरील सालींवर आर्चिडसारखी फुलेलेली फुलशेती देखील आकर्षण ठरले. जिरायती भागातील कांदा, मक्यापासून ते स्ट्रॉबेरीपर्यंत सारीच पिके वेगळ्या तंत्राच्या माध्यमातून घेण्याचे धडे शेतकºयांनी गिरविले.


यावेळी अनेक शेतकºयांनी कृषि विकास प्रतिष्ठानचे चेअरमन राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार यांच्याशी शेतीप्रयोंगाच्या पाहणीनंतर संवाद साधुन नाविन्यपुर्ण, आधुनिक शेतीप्रयोग प्रथमच पाहिल्याचे सांगितले.
पॉलिहाउस प्रमाणे वेगळे तंत्र वापरलेल्या शेडनेट मध्ये केलेला कमी खर्चात ऊत्तम भाजीपाला प्रयोग शेतकºयांनी अभ्यासला. शेतकºयांसाठी आयआयटी मुंबई संशोधित केलेले पाणी धरून ठेवणारी हायड्रोजलसारखी साधने प्रदर्शनात आहेत.


...१६०० किलोच्या ‘कमांडो’ बरोबर सेल्फीसाठी गर्दी
४पशु पक्षी प्रदर्शनात खिलार, गीर, सहिवाल, थारपारकर, देवनी, लालकंदारी या देशी गोवंशाच्या जनावरे पाहण्यासाठी गर्दी यंदाही होती.मात्र, यावेळी म्हशींसह १६०० किलो वजनाच्या पुणे येथील मुºहा जातीच्या ‘कमांडो’ या रेड्याने केलेला डीस्को डीजेच्या तालावरील रॅम्पवॉक अनेकांनी प्रथमच अनुभवला. यावेळी अनेकांनी जल्लोष करताना ताल देखील धरला. तर मुख्य आकर्षण ठरलेल्या कमांडो बरोबर सेल्फी काढण्यासाठी तोबा गर्दी झाली होती.यावेळी लासा अ‍ॅप्सो,रॉटवेलर,कारवान,कॉकर स्पॅनिनल,लॅ ब्राडोर,डॉबरमॅन आदी जातींचे श्वानासह सात फुटी शिंगाची पंढरपुरी म्हैस शेतकºयांच्या कौतुकाचे विषय ठरले.

खानदेशी मांडे,दही चटणी, हूरड्याचे थालीपीठ
४भीमथडी यात्रेतील खाऊगल्लीत खानदेशी मांडे, दही चटणी, हूरड्याचे थालीपीठ, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, कांदाभजी,हरीयाणा जिलेबी, मटकी ठेचा, ताक मसाला, बाजरीची भाकरी, हुरडा, गुळपट्टी, पिठले भाकरी, मलईचे आईस्क्रीम आदी खाद्य पदार्थ खवय्यांचे आकर्षण ठरले. बचत गटांनी सर्व पदार्थ बनविले होते.

Web Title: Rashwalk, 'Commando Reda' attraction of buffaloes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.