लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटितेवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 11:27 PM2018-08-16T23:27:28+5:302018-08-17T00:22:30+5:30

संकेतस्थळावर विवाहाची नोंदणी केलेल्या घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना खराबवाडी येथे घडली

rape on women in kharabwadi | लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटितेवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटितेवर बलात्कार

Next

चाकण - संकेतस्थळावर विवाहाची नोंदणी केलेल्या घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना खराबवाडी (ता. खेड) येथे घडली असून या प्रकरणी एका २६ वर्षीय तरुणावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार सी. एम. गवारी यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १७ जून ते १९ जून २०१८ दरम्यान खराबवाडी येथे घडली. पीडित महिलेने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रमेश सोनकांबळे (वय २६, रा. खराबवाडी, चाकण) याचेवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी कि, पीडित महिला ही घटस्फोटित असून या महिलेने मार्च २०१८ मध्ये एका संकेतस्थळावर विवाहासाठी नोंदणी केली होती. त्यावरून आरोपी सोनकांबळे याने लग्नासाठी विनंती करून फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपद्वारे दररोज बोलणे होत असे. त्यांनतर त्याने पीडित महिलेला पुण्याला बोलावले व पुण्याला येण्यासाठी महिलेच्या बँक खात्यात दोन हजार रुपये पाठवले. पीडिता १७ जूनला पुण्याला पोहोचली. तेथून खराबवाडीत मित्राच्या रूमवर नेले. दुसऱ्या दिवशी देहूला जाऊन लग्न करू असे सांगितले व त्यारात्री जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. पुढील तीनही दिवस मित्राच्याच रूमवर ठेवून अतिप्रसंग केला व लग्नासाठी टाळाटाळ केली. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय नीलपत्रेवार, राजेंद्र मोरे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: rape on women in kharabwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.