Rape on women by giving unconscious medicine | गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार
गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार

ठळक मुद्देपीडितेचा अश्लील व्हिडिओ तयार करून त्याद्वारे ब्लकमेल करत अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आरोपीची पत्नी अर्चना श्रीवास्तव हिच्याविरोधातही गुन्हा दाखल अनेक मित्रांना फिर्यादी महिलेचे अश्लील फोटो तसेच मेसेज पाठवून महिलेची बदनामी

पुणे : टॅटू काढण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध देत तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने पीडितेचा अश्लील व्हिडिओ तयार करून त्याद्वारे ब्लकमेल करत अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी एकास अटक केली आहे. 
प्रशांत श्रीवास्तव (रा. उंबऱ्या गणपती चौक, धायरी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीविरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा घटस्फोट झाला असून ती मुलीसह धायरी परिसरात राहत आहे. आरोपी श्रीवास्तव याचे धायरी परिसरात मेडिकलचे दुकान आहे. महिला त्याच्या दुकानासमोर कार उभा करत असत. त्यामुळे दोघांची ओळख झाली.
   आरोपी प्रशांत मेडिकल चालविण्यासोबत टॅटू आर्टिस्ट म्हणूनही काम करतो. त्यामुळे फिर्यादी महिलेने त्यास टॅटू काढण्यास सांगितले. सुमारे एक वर्षांपूर्वी ती मेडिकलमध्ये टॅटू काढण्यासाठी गेली होती. तेव्हा टॅटू काढत असताना त्रास होत असल्यामुळे आरोपीने पेनकिलरचे औषध देण्याच्या बहाण्याने तिला बेशुध्द होण्याची गोळी दिली. महिला बेशुध्द झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. याप्रकाराची त्याने अश्लील व्हिडिओ तयार केत्यानंतर आरोपीने पीडित महिलेस तुझा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी दिली. तसेच तिला स्वत:च्या दुकानात, फिर्यादीच्या घरी व लॉजवर नेवून वारंवार अत्याचार केले. आरोपीने काही दिवसापूर्वी तिला भेटायला बोलावून घेतले. मात्र, तिने नकार दिल्यामुळे त्याने चिडून त्याच्या अनेक मित्रांना फिर्यादी महिलेचे अश्लील फोटो तसेच मेसेज पाठवून तिची बदनामी केली. दरम्यान, दुसऱ्या महिलेसोबत पतीचे लैंगिक संबंध असल्याची माहिती आरोपीच्या पत्नीला मिळाली. तिनेही फिर्यादीला ब्लॅकमेल करत गर्भपाताच्या गोळ्या विक्री करण्यास भाग पाडले. तसेच पतीविरोधात तक्रार दिल्यास तुझी सुपारी देवून तुला जीवे मारेन अशी धमकी दिली. त्यामुळे आरोपीची पत्नी अर्चना श्रीवास्तव हिच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन खोडदे करत आहेत. 


Web Title: Rape on women by giving unconscious medicine
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.