भीक मागून उदरनिर्वाह करणा-या कुूटुंबातील एक वर्षाच्या मुलीवर बलात्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 05:19 PM2018-06-15T17:19:40+5:302018-06-15T20:00:29+5:30

तिचं वय अवघं एक वर्ष... ती गेल्या दोन दिवसांपासून गायब होती..रस्त्यावर मिळालेल्या भीकेत आपली उपजीविका भागवणारे तिचे कुटुंब... पण अवघ्या एक वर्ष वयातच वासनेने पिसाट झालेल्या नराधमाची ती शिकार ठरली...यातच तिने या निर्दयी जगाचा निरोप घेतला...

Rape a one year old girl in loni kalbhor | भीक मागून उदरनिर्वाह करणा-या कुूटुंबातील एक वर्षाच्या मुलीवर बलात्कार 

भीक मागून उदरनिर्वाह करणा-या कुूटुंबातील एक वर्षाच्या मुलीवर बलात्कार 

googlenewsNext
ठळक मुद्देनशेच्या गुंगीत केलेल्या बलात्कारात मुलीचा गुदमरून मृत्यू झाला असल्याचा डॉक्टरांचा अहवाल

लोणीकाळभोर :  एक वर्षे वयाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना शुक्रवारी पहाटे लोणी स्टेशन परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी चार तासांमध्ये एकाला अटक केली आहे. आरोपीने सदर कृत्याची कबुली दिली आहे. आरोपीविरोधात लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
  याप्रकरणी मल्हारी हरिभाऊ बनसोडे ऊर्फ हड्डीपप्या (वय २२, रा. कदमवाकवस्ती, जिल्हा परिषद शाळेशेजारी, ता. हवेली) या मद्यपी तरूणास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी रूकम्मा सुब्रह्मण्यम (वय ६५, रा. गुरूराजपालयम, आंबुर जवळ, वेल्लुर, चेन्नई, तामिळनाडू) यांनी फिर्याद दिली आहे. 
हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास गरूड यांनी दिलेल्या माहितीनुसार उदरनिवार्हाचे साधन शोधण्यासाठी रूकम्मा या आपली सून कविता, तिचा मुलगा गणेश (वय ८) नात पुष्पसती व तिच्या मुली पूजा (वय २) व सुहासिनी (वय १) यांच्यासमवेत दहा दिवसांपूर्वी रेल्वेने लोणी काळभोर येथे आले होते. निवा-याचे साधन नसल्याने पहिले सहा दिवस त्यांनी लोणी रेल्वे स्थानकावरच मुक्काम केला. त्यानंतर तेथे राहण्यास मनाई केल्याने गेल्या चार दिवसांपासून ते सर्वजण दिवसभर भीक मागून रात्रीच्यावेळी पुणे - सोलापूर महामार्गालगत असलेल्या जय कृष्णा गारमेंट या दुकानापुढे असलेल्या मोकळ्या जागेत मुक्काम करत होते. मंगळवारी (दि.१४ जून ) रात्रीपासून सुहासिनी हरवली होती. अखेर शुक्रवारी (१५ जून ) रोजी पहाटे महामार्गाच्या पलीकडे असलेल्या एसटी थांब्यामागे असलेल्या मोकळ्या जागेत सुहासिनी मृत अवस्थेत आढळली होती. तिच्या शरीरावर ओरखडल्याच्या जखमा होत्या. मयत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. 
       बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पखाले, हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरूड, जिल्हा ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी घटनास्थळी भेट दिली. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने आसपासच्या परिसरात शोध घेतला असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकजण मुलीला घेऊन जाताना दिसला. मल्हारी बनसोडे याने नशेच्या गुंगीत केलेल्या बलात्कारात तिचा गुदमरून ती मृत्यूमुखी पडली असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे.

Web Title: Rape a one year old girl in loni kalbhor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.