सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन त्या नराधमाने केला होता तिचा खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 01:30 PM2018-07-13T13:30:53+5:302018-07-13T13:34:12+5:30

४ जुलैच्या रात्री ६ वर्षीय पीडित मुलीचा मृतदेह ताडीवाला रस्त्यावरील एका टेम्पोच्या सीटमध्ये तिचा मृतदेह आढळला होता.

rape and after murder of six year girl by criminal | सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन त्या नराधमाने केला होता तिचा खून 

सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन त्या नराधमाने केला होता तिचा खून 

Next
ठळक मुद्देशवविच्छेदन अहवालातून धक्कादायक बाब समोर , ताडीवाला रस्त्यावरील टेम्पोत आढळला होता मृतदेह,

पुणे : ताडीवाला रस्त्यावर टेम्पोमध्ये आढळून आलेल्या सहा वर्षीय चिमुकलीच्या मृतदेहावर बलात्कार झाल्याची धक्कादायक बाब शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गणेश बसवराज गायकवाड (वय २०, रा. ताडीवाला रस्ता, मूळ. कर्नाटक) याला अटक करण्यात आली आहे. या नराधमावर बलात्कार (भादवी ३७६) आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी गायकवाड याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. 
    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  ४ जुलैच्या रात्री ६ वर्षीय पीडित मुलीचा मृतदेह ताडीवाला रस्त्यावरील एका टेम्पोच्या सीटमध्ये तिचा मृतदेह आढळला होता. सुरुवातीला याप्रकरणी गळा आवळून खून गेल्याची तक्रार देण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी गायकवाड याला अटक केली आहे. टेम्पोचा दरवाजा वाजवून त्रास दिल्याने पीडितेचा खून केल्याचे आरोपीने सांगितले होते. मात्र, तिच्यावर अत्याचार झाल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले आहे. यावरून त्याने अत्याचार करून तिचा खून केल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्यावर बलात्कार, बाललैंगिकच्या वाढीव कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणी करण्यासाठी गायकवाडला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. बंडगार्डन पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक एस. ए. जमदाडे तपास करत आहेत.

Web Title: rape and after murder of six year girl by criminal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.