पुण्यातील गोळीबार मैदान व ईदगाह मशिदेत नमाज पठण करत रमजान ईद उत्साहात साजरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 07:14 PM2019-06-05T19:14:08+5:302019-06-05T19:33:20+5:30

नवीन पोशाख परिधान करून लहान मुले, मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने आले होते.

Ramzan eid celebrates with Namaz reading on golibar ground and Idgah mashid in Pune | पुण्यातील गोळीबार मैदान व ईदगाह मशिदेत नमाज पठण करत रमजान ईद उत्साहात साजरी

पुण्यातील गोळीबार मैदान व ईदगाह मशिदेत नमाज पठण करत रमजान ईद उत्साहात साजरी

googlenewsNext
ठळक मुद्देराजकीय पक्ष, विविध संघटनांकडून गुलाबाचे फूल देऊन बांधवांचे स्वागतसकाळी साडेनऊला पहिली नमाज, तर दुसरी नमाज साडेदहा वाजता महापलिकडून पाण्याच्या टँकरची व्यवस्था पोलिसांचा चोक बंदोबस्त 

पुणे : रमजान ईदनिमित्त शहरातील अनेक भागात मुस्लिम बांधवानी गोळीबार मैदान व ईदगाह मशीद येथे नमाज पठण केले. याप्रसंगी राजकीय पक्ष, विविध संघटनांकडून गुलाबाचे फुल देऊन स्वागत करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला.  


सकाळी साडेनऊ वाजता पहिली नमाज, तर दुसरी नमाज साडेदहा वाजता झाली. नवीन पोशाख परिधान करून लहान मुले, मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने आले होते. एकमेकांची गळेभेट घेत ईदच्या शुभेच्या देत होते. यावेळी खासदार गिरीश बापट, काँग्रेस नेते मोहन जोशी, सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे, आमदार मेधा कुलकर्णी, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका सुजाता शेट्टी व विविध सामाजिक संघटनांच्या नेत्यांनी भेट देऊन शुभेच्या दिल्या. 

काशेवाडी, भवानी पेठ, हरका नगर, राजेवाडी, लोहियानगर, मोमीन पुरा, गुलटेकडी, डायस प्लॉट, मोदी खाना, सॅलसबरी पार्क , भीमपुरा, चुडा मंताली, कॅम्प आणि कोंढवा परिसरातील सुमारे वीस हजार पेक्षा जास्त  मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी मैदानावर आले होते. 

महापलिकडून पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली होती. लष्कर विभागाकडून अग्निशमन गाडी, रुग्णवाहिकेची व्यवस्था केली होती. सामाजिक कार्यकर्ते इसाक जाफर मेमन गेल्या तीस वर्षांपासून स्वत:च्या खर्चातून स्टॉल उभा करत असून व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून कार्यक्रमाचे नियोजन करतात. पाणी व्यवस्था, दरी, स्वछता, याची ते १५ दिवसांपासून तयारी करत आहेत. समितीकडून सर्व धर्मातील नागरिक व राजकीय पक्ष, संघटनांना येथे बोलावले जाते व त्यांचा सत्कार देखील केला जातो. 
वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गणेश जाधव, आरिफ मुंगळे, महाराष्ट्र प्रवक्ता प्रमोद संखद, विनोद कांबळे यांनी मुस्लिम बांधवाना गुलाबाच्या फुलांचे वाटप केले.  

...................
पोलिसांचा चोक बंदोबस्त 
पोलीस विभागाकडून येणाऱ्या बांधवाची संख्या लक्ष्यात घेता चोख बंदोबस्त ठेवला होता. वरिष्ठ अधिकारी, विशेष शाखेचे पोलीस अधिकारी, वाहतूक शाखेचे अधिकारी, साध्या वेशातील पोलीस आणि पोलीस शिरपाई असे एकूण ऐंशी पोलीस कर्मचारी तैनात केले होते, अशी माहिती लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले यांनी दिली.  
..................................

ईदगाह  येथे नमाज पठण केले तर तो पवित्र आणि नशीबवान 
ईद मिलनाची नमाज सुमारे गेल्या १२० वर्षांपासून गोळीबार मैदान आणि ईदगाह मशीदीत होते. रमजान ईद आणि बकरी ईद  फक्त दोन वेळाच वर्षातून येथे नमाज होते.

सर्व मुस्लिम बांधव येथे एकत्र येण्याची परंपरा जपतात. पाहुणे, मित्र यांच्या भेटीगाठी होतात, त्यामुळे आवर्जून येथे बांधव जमतात. हमाल, ड्रायव्हर, बाहेरच्या गावातील लोक येथे ईदला नमाज पठण करतात. शिरखुमाला येण्याचे आमंत्रण दिले जाते. ईदगाह येथे नमाजपठण केले तर ते पवित्र नशीबवान असल्याचे मानले जाते. येथे धमार्तील कोणत्या ही जातीभेद केला जात नाही. नमाज पडून झाले तरी येथे थांबून असतो. शुभेच्छा दिल्या जातात. समाधान वाटते, ईद साजरी केल्या सारखे वाटते. काही व्यक्ती वषार्तून दोन वेळाच नमाज पठण करतात त्यांना समाधान वाटते, अशी माहिती मौलाना शफी शेख यांनी माहिती दिली. 

Web Title: Ramzan eid celebrates with Namaz reading on golibar ground and Idgah mashid in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.