अयोध्येत त्याच जागेवर राम मंदिर - अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 05:00 AM2019-02-10T05:00:59+5:302019-02-10T05:05:02+5:30

केंद्र सरकारने मागील साडेचार वर्षात केलेल्या विविध योजनांचा विस्ताराने दाखला देत, ‘चिंता करू नका, ते आपापल्या राज्यातच मोठे आहेत’ अशा शब्दांमध्ये तिसऱ्या आघाडीची भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी खिल्ली उडविली.

Ram temple in the same place Ayodhya - Amit Shah | अयोध्येत त्याच जागेवर राम मंदिर - अमित शहा

अयोध्येत त्याच जागेवर राम मंदिर - अमित शहा

Next

पुणे : केंद्र सरकारने मागील साडेचार वर्षात केलेल्या विविध योजनांचा विस्ताराने दाखला देत, ‘चिंता करू नका, ते आपापल्या राज्यातच मोठे आहेत’ अशा शब्दांमध्ये तिसऱ्या आघाडीची भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी खिल्ली उडविली. अयोध्येत त्याच जागेवर भव्य राममंदिर निर्माण करण्याचा नाराही त्यांनी दिला.
पुणे, बारामती व शिरूर या लोकसभा मतदारसंघातील बूथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुखांचे संमेलन शहा यांच्या उपस्थितीत गणेश कला क्रीडा मंदिर येथे शनिवारी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर,प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, आदी उपस्थित होते.
भाजपा राममंदिर बांधण्यासाठी कटिबद्ध आहे. शरद पवार व काँग्रेस यांनी राम मंदिराबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. प्रकरण न्यायालयात असल्यामुळेच भाजपा थांबली आहे. ममतांची सभा कोल्हापुरात लावली, देवगौडांची सभा पुण्यात घेतली. अखिलेशला धुळ्यात बोलावले, तर कोणी त्यांना ऐकण्यासाठी येतील का? त्यांची चिंता करू नका, ते फक्त आपापल्या राज्यातच मोठे आहेत. भाजपा ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे, नेत्यांची नाही. ममतांचा बंगाल तसेच ओडिशा येथेही भाजपाच जिंकणार आहे, असे शहा यांनी सांगितले.
लोकसभेच्या ४३ जागा जिंकू
राज्यात आम्ही सर्वच जागा लढवू आणि ४३ जागा जिंकूच. ४३ वी जागा बारामतीची असेल, तिथेही कमळ फूलवू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Web Title: Ram temple in the same place Ayodhya - Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.