अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 08:13 PM2018-07-11T20:13:27+5:302018-07-11T20:22:28+5:30

अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे घरात अडकलेल्या महिलेची सुखरुप सुटका करण्यात अाली अाहे. घरातील गॅस सुरु असताना महिलेची शुद्ध हरपली हाेती. त्यात घरातून धूर येत असल्याने एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता हाेती.

quick response by firebrigade saves the women | अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ

अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ

Next

पुणे : अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे घरात बेशुद्ध अवस्थेतील महेलेची सुखरुप सुटका करण्यात अाली अाहे. पुण्यातील माेहननगर भागात ही घटना दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. 


     माेहननगर येथील शिवशंकर अपार्टमेंटच्या एका फ्लॅटमधून माेठ्या प्रमाणात धूर येत असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला नागरिकांंनी दिली. फ्लॅटचे दार बंद असून अातमध्ये एक महिला अडकली असल्याचे नागरिकांनी सांगितले. नियंत्रण कक्षाकडून तात्काळ कात्रज अग्निशमन केंद्राची फायरगाडी व देवदूत क्विक रिस्पाॅन्स टीम घटनास्थळी पाठवण्यात अाली. घटनास्थळी पोहचताच बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरुन धूर येत असल्याचे जवानांच्या लक्षात अाले. फ्लॅटचा दरवाजा आतमधून बंद केला असल्याची खात्री होताच जवानांनी कटरच्या साह्याने लोखंडी दरवाजा कापून घरामधे प्रवेश केला. तेव्हा किचनमधे गॅस शेगडीवर बराच वेळ कुकर सुरू असून त्यामुळे घरामधे धूर पसरला हाेता. तसेच एकीकडे घरातील महिला शुद्धित नसल्याचे लक्षात अाले. जवानांनी तात्काळ गॅस बंद करुन महिलेला शुद्धीवर अाणले. अग्निशमन अधिकारी प्रकाश गाेरे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णवाहिकेला सुद्धा पाचारण केले. महिलेच्या डाेळ्यांची शस्त्रक्रिया झाली असल्याने तसेच तिला अाैषधे सुरु असल्याने तिला गाढ झाेप लागली हाेती. 


    घरातून धूर येत असल्याचे नागरिकांनी लवकर अग्निशमन दलाला कळविल्याने तसेच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. या कामगिरीमधे कात्रज अग्निशमन केंद्राचे अग्निशमन अधिकारी प्रकाश गोरे, तांडेल दत्तात्रय थोरात, वाहन चालक अनंता जागडे व जवान राजेश घडशी, किरण पाटील, जयेश लबडे, अमोल कर्डेकर, रमेश मांगडे आणि देवदूत क्विक रिस्पॉन्स टिमचे राहुल मालुसरे, निलेश तागुंदे, तुषार पवार यांनी सहभाग घेतला.

Web Title: quick response by firebrigade saves the women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.