पुरंदर विमानतळ भूसंपादन : सीमारेषा निश्चितीची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 02:54 AM2018-05-11T02:54:36+5:302018-05-11T02:54:36+5:30

राज्य शासनाकडून पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनास प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्यात आली, असली तरी विमानतळाच्या सीमारेषा निश्चित करण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.

Purandar Airport Land Acquisition: The boundary repair process started | पुरंदर विमानतळ भूसंपादन : सीमारेषा निश्चितीची प्रक्रिया सुरू

पुरंदर विमानतळ भूसंपादन : सीमारेषा निश्चितीची प्रक्रिया सुरू

googlenewsNext

पुणे - राज्य शासनाकडून पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनास प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्यात आली, असली तरी विमानतळाच्या सीमारेषा निश्चित करण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे भूसंपादनाची स्वतंत्र अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरू होईल, असे जिल्हा प्रशासनातील भूसंपादन विभागातील अधिकाºयांनी सांगितले.
पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी सुमारे २ हजार ३६७ कोटी जमीन संपादित करावी लागणार आहे. तसेच त्यासाठी अंदाजे ३ हजार ५१३ कोटी रुपये खर्च अपेक्षित
आहे. त्यातही जमीन भूसंपादनास अंदाजे २ हजार २७१ कोटी आणि फळझाडे, विहिरी, ताली आदीसाठी अंदाजे ८०० कोटी रुपयांचा मोबदला शेतकºयांना द्यावा लागू शकतो. मात्र, कोणत्या गावातील किती एकर जमिनीचे संपादन करावे लागणार असून त्यासाठी किती खर्च येईल याची अचूक माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. तसेच विमानतळाच्या सीमारेषाही अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. जमिनीसंदर्भातील अचूक माहिती प्राप्त झाल्यानंतर भूसंपादनाची स्वतंत्र अधिसूचना प्रसिध्द होईल. त्यामुळे शासनाकडून भूसंपादनास प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली असली तरी
भूसंपादन सुरू करण्यास अजून काही कालावधी थांबावे लागणार आहे.

- विमानतळासाठी संपादित केल्या जाणा्नयिा जमिनीमुळे एकही गावठाण बाधित होणार नाही; याची काळजी घेतली जाणार असल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले होते.

- त्यामुळे विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी व उदाची वाडी या सात गावांतील कोणत्या गट क्रमांकातील किती एकर जमिनीचे संपादन करावे लागणार याबाबतची माहिती घेण्याची प्रक्रिया स्पेशल प्लॅनिंग अ‍ॅथेरोटीकडून सुरू आहे.

Web Title: Purandar Airport Land Acquisition: The boundary repair process started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.