पुण्याच्या 'अायटम'ने गाजवली दिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 08:50 PM2018-04-21T20:50:04+5:302018-04-21T21:03:34+5:30

पुण्यातल्या नाटक कंपनी या संस्थेच्या अायटम या हिंदी नाटकाला मानाच्या महिंन्द्रा एक्सलन्स थिअटर अॅवाॅर्डस या स्पेर्धेत सर्वाेत्कृष्ट नाटकाचे पारिताेषिक मिळाले अाहे.

pune's item play won the 'meta' award | पुण्याच्या 'अायटम'ने गाजवली दिल्ली

पुण्याच्या 'अायटम'ने गाजवली दिल्ली

पुणे : अाम्हाला 'नाटक' करायचंय, या एका विचाराने मार्गक्रमण करणारी पुण्यातील 'नाटक कंपनी' या नाट्यसंस्थेची विशी- पंचविशीतली तरुण मुलं. नाटकासाठी स्वतःला झाेकून देणारी ही तरुण मंडळी. अापलं नाटक अापला विचार लाेकांपर्यंत पाेहचविण्यासाठी कामाला लागलेल्या या तरुणांनी थेट दिल्लीला धडक मारत मराठीचा झेंडा अटकेपार राेवला अाहे. नाटक कंपनीच्या अायटम या नाटकाला मानाच्या समजल्या जाणाऱ्या महिंद्रा एक्सलन्स थिएटर्स अॅवाॅड्स (मेटा) चे सर्वेात्कष्ट नाटकाचे पारिताेषिक मिळाले अाहे. तर याच नाटकातील कलाकार साईनाथ गणुवाड याला सर्वाेत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला अाहे. 
    दिल्लीत पार पडलेल्या या स्पर्धेत भारतातून 335 नाटकांमधून 10 नाटके निवडण्यात अाली हाेती. या नाटकांचे प्रयाेग नुकताच दिल्लीत पार पडले. अंतिम फेरीसाठी रजत कपूर, अमल अल्लाना, लिलेट दुबे, नीलम मानसिंग, रणजित कपूर अाणि शाेभा दीपक सिंग हे देशातील नाट्यक्षेत्रातील दिग्गज परिक्षक म्हणून हाेते. पुण्यातील तरुण लेखक सिद्धेश पूरकर याने या नाटकाचे लेखन केले अाहे तर क्षितिष दाते याने या नाटकाचे दिग्दर्शन केले अाहे. महिलांना एक उपभाेगाची वस्तू म्हणून सातत्याने समाेर अाणले जाते, मग ते जाहिराती असाे किंवा सिनेमा. याच प्रवृत्तीवर या नाटकातून भाष्य करण्यात अाले अाहे. नुकताच चित्रपट क्षेत्रामध्ये हाेणारे कास्टिंग काऊचचे वास्तव अनेक अभिनेत्रींनी समाेर येऊन सांगितले. बी ग्रेड सिनेमांमध्ये स्त्रीयांना वस्तू म्हणून माेठ्या प्रमाणावर दाखविण्यात येते. व्दिअर्थी संवादातून स्त्रीयांचे नेहमीच चारित्र हनन करण्यात येत असते. याच बी ग्रेड फिल्म इंडस्ट्रीचं वास्तव या नाटकातून दाखविण्यात अाले अाहे. 
    नाटकाला पुरस्कार मिळाल्यानंत अापल्या भावना व्यक्त करताना सिद्धेश पूरकर म्हणाला, मेटा पुरस्कार मिळाल्याने खरंतर माझा नाटक करण्यामागचा विचार पाेहचविण्यात मी यशस्वी झालाे अाहे असं मला वाटतं. अनेकदा नाटकांमध्ये असणारा एकसुरीपणा मला नकाे हाेता. त्यामुळे वेगळं काहीतरी करण्याच्या विचारात मी हाेताे. मी जाे विषय या नाटकातून मांडला अाहे ताे बी ग्रेड फिल्म इंडस्ट्री बद्दल असल्याने मी नाटक हिंदीत लिहायला घेतलं.  विविध चित्रपट, जाहिरातींमधून स्त्री ची वेगळी प्रतिमा दाखविली जाते. त्याचा स्त्रीयांवर फरक पडत असताे. या पडद्यामागून चाललेल्या गाेष्टी भयानक आहेत. त्याचा समाजमनावर कळत-नकळत खाेलवर परिणाम हाेत असताे. हेच वास्तव अाम्ही या नाटक्याच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. 
    सर्वेात्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला साईनाथ म्हणाला, मला सर्वेातकृष्ट अभिनेत्याचं पारिताेषिक मिळालं याच्यापेक्षा अामच्या नाटकाला सर्वाेत्कृष्ट नाटकाचं पारिताेषिक मिळालं याचा जास्त अानंद अाहे. या नाटकाला उभं करण्यात अाम्ही खूप कष्ट घेतले हाेते. खासकरुन नाटकाचा लेखक सिद्धेश अाणि नाटकाचा सूत्रधार रवी चाैधरी या दाेघांचे हे नाटक दिल्लीपर्यंत नेण्यात माेठा वाटा अाहे. मेटासाठी नाटक निवडलं गेलं तेव्हाच अाम्हाला खूप अानंद झाला हाेता, त्यामुळे पुरस्कार मिळाल्यनंतर अामचा अानंद गगणात मावेनासा झाला. मेटा सारख्या माेठ्या व्यासपीठावर अामच्या नाटकाला गाैरवनं अामच्यासाठी खूप माेठी गाेष्ट अाहे. 

Web Title: pune's item play won the 'meta' award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.