पुण्यात बीआरटी रोडवर डंपर-बाईकचा भीषण अपघात, दोन कॉलेज तरुणांचा दुर्देवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 01:35 PM2017-12-30T13:35:31+5:302017-12-30T13:37:24+5:30

संगमवाडी येथील बीआरटी मार्गातून जाणा-या डंपरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

In Pune | पुण्यात बीआरटी रोडवर डंपर-बाईकचा भीषण अपघात, दोन कॉलेज तरुणांचा दुर्देवी मृत्यू

पुण्यात बीआरटी रोडवर डंपर-बाईकचा भीषण अपघात, दोन कॉलेज तरुणांचा दुर्देवी मृत्यू

पुणे - संगमवाडी येथील बीआरटी मार्गातून जाणा-या डंपरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. सागर अनिल महाजन (वय २०, रा़ ब्रम्हा स्काय, एअरपोर्ट रोड) आणि मोबीन अली इदमे आजम (वय २०, रा़ ब्रम्हा स्काय, लोहगाव) अशी या तरुणांची नावे आहेत. हा अपघात मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडला. दोघेही सिंबायोसिस महाविद्यालयात शिकत होते. सागर महाजन हा मुळचा बेळगावचा राहणारा आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिंबायोसिसच्या विमाननगर येथील महाविद्यालयात शिकणारी सहा मुले ३ गाड्यांवरुन रात्री चतु:श्रृंगीकडून संगमवाडीकडे जात होती. संगमवाडीच्या बीआरटी मार्गातून हे दोघे जात होते. सादलबाबा दर्गाहून संगमवाडीकडे जात असताना समोरुन आलेल्या डंपरला त्यांची दुचाकी धडकली. ही धडक इतकी जोरात होती की, त्यामुळे बीआरचे रेलिंगही तुटले. अपघाताचे वृत्त समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही वाहने बाजूला काढली. पोलिसांनी या दोन तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. या अपघातामुळे बीआरटी मार्गातून जाणारी अन्य वाहने व दुचाकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

बसअखेरीस कोणतेही वाहन बीआरटी मार्गातून जाऊ नये, यासाठी महापालिकेने वॉर्डनची नेमणूक केली आहे. तरीही या वॉर्डनना न जुमानता अनेकदा त्यांना धमकावून दुचाकी व चारचाकी वाहने बेकायदेशीरपणे घुसतात. संगमवाडी बीआरटी मार्ग सुरु झाल्यापासून या बीआरटी मार्गावर इतर बीआरटी मार्गापेक्षा अधिक अपघात झाल्याचे दिसून येत आहे. 

Web Title: In Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे