पुणे: महिला प्रवाशाना 'तेजस्विनी' भेट, आठ मार्गांवर विशेष बस सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 01:01 PM2018-03-08T13:01:11+5:302018-03-08T13:01:11+5:30

महिला प्रवाशांना पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) कडून जागतिक महिला दिनानिमित्त 'तेजस्विनी' बसची विशेष भेट देण्यात आली.

pune- special bus service for womens on eight routes | पुणे: महिला प्रवाशाना 'तेजस्विनी' भेट, आठ मार्गांवर विशेष बस सेवा

पुणे: महिला प्रवाशाना 'तेजस्विनी' भेट, आठ मार्गांवर विशेष बस सेवा

googlenewsNext

पुणे : महिला प्रवाशांना पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) कडून जागतिक महिला दिनानिमित्त 'तेजस्विनी' बसची विशेष भेट देण्यात आली. गुरुवारपासून शहरांतील आठ मार्गांवर खास महिलांसाठी नवीन ३० बस सुरू करण्यात आल्या असून या बसेसला ‘तेजस्विनी’ असे नाव देण्यात आले आहे.

‘पीएमपी’च्या बसेसने सध्या पुणे, पिंपरी चिंचवडसह लगतच्या परिसरातील दहा लाखांहून अधिक नागरीक प्रवास करतात. या प्रवाशांमध्ये महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. तरीही यापूर्वी केवळ तीन मार्गावर गर्दीच्यावेळी बस सोडल्या जायच्या. इतर बसेसमध्ये महिलांसाठी डाव्या बाजूकडील जागा राखीव असल्या तरी अनेकदा पुरूष प्रवासी तिथे बसलेले असतात. ‘पीएमपी’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी पहिल्याच दिवशी महिलांसाठी चांगली सेवा देण्याचे सुतोवाच केले होते. त्यानुसार जागतिक महिला दिनापासून महिलांसाठी नवीन ३० बस सुरू करण्यात आल्या आहेत.  ‘पीएमपी’ ताफ्यात टप्प्याटप्याने २०० अत्याधुनिक मिडी बस दाखल होणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात आलेल्या ३० बसेस महिला विशेष म्हणून सोडण्यात आल्या असून या बसेसचे 'तेजस्विनी' असे नामकरण करण्यात आले आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमधे विविध सात ठिकाणी सकाळी या बसेसला हिरवा झेंडा दाखविन्यात आला. कात्रज बस स्थानकावर महापौर मुक्ता टिळक आणि नयना गुंडे यानी हिरवा झेंडा दाखउन बस मार्गस्थ केल्या. यावेळी महिला प्रवाशांचेही उत्साहात स्वागत करण्यात आले. या बसेसमधे प्राधान्याने महिला वाहक असणार आहेत.

नविन आठ मार्गावर सकाळी १२० व दुपारी ९८ अशा एकुण २१८ फेर्या होणार आहेत. तर यापूर्वीच्या तीन मार्गावरील सहा फेर्याही सुरूच राहणार आहेत. त्यामुले आता महिलांसाठी एकूण ११ मार्गावर २२६ बस फेर्या होणार आहेत. दरम्यान, बसमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी ३२ खुर्च्यांची व्यवस्था असून चालकाच्या मागील बाजुच्या सीट बेल्टची व्यवस्था आहे. बसमध्ये पुढे व मागील बाजुस प्रत्येकी एक सीसीटीव्ही कॅमेरा आहे. मागील दरवाजाजवळ कचरा कुंडी आहे. बसमध्ये डिजिटल फलक असून त्यावर प्रत्येक थांब्याची माहिती झळकणार आहे. मार्गावरील बसचे ठिकाण, बसची स्थिती याबाबतची सर्व माहिती ‘आयटीएमएस’ यंत्रणेद्वारे नियंत्रण कक्षात कळणार आहे.

‘तेजस्विनी’चे बस मार्ग  

१. हडपसर ते वारजे माळवाडी 
२. मनपा भवन ते लोहगाव           
३. कोथरूड डेपो ते कात्रज         
४. कात्रज ते शिवाजीनगर स्टेशन             
५. निगडी ते  हिंजवडी माण फेज -३         
६. कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग सोसायटी         
७. भोसरी ते मनपा                 
८. भेकराईनगर ते मनपा             
 

Web Title: pune- special bus service for womens on eight routes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.