पुणे-सोलापूर महामार्ग : धोकादायक फ्लेक्स बोर्ड जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 02:28 AM2018-02-01T02:28:57+5:302018-02-01T02:29:09+5:30

कुरकुंभ (ता. दौंड) येथील पुणे-सोलापूर महामार्गावर असणा-या भराव पुलाला सध्या अनधिकृत फ्लेक्सचा विळखा बसला असून, या फ्लेक्सचा त्रास महामार्गावरील वाहनांनादेखील होऊ लागला आहे. चुकीच्या पद्धतीने बांधलेले फ्लेक्स जोराच्या वा-याने खालच्या बाजूने उलटून बांधलेल्या दिशेने वर जावून महामार्गावर अडचण ठरत आहे, त्यामुळे सुसाट वेगाच्या या महामार्गावर दुचाकीस्वार व वाहनचालकांचा ताबा सुटून मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही.

Pune-Solapur Highway: Dangerous Flex Board Fatality | पुणे-सोलापूर महामार्ग : धोकादायक फ्लेक्स बोर्ड जीवघेणे

पुणे-सोलापूर महामार्ग : धोकादायक फ्लेक्स बोर्ड जीवघेणे

googlenewsNext

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील पुणे-सोलापूर महामार्गावर असणा-या भराव पुलाला सध्या अनधिकृत फ्लेक्सचा विळखा बसला असून, या फ्लेक्सचा त्रास महामार्गावरील वाहनांनादेखील होऊ लागला आहे. चुकीच्या पद्धतीने बांधलेले फ्लेक्स जोराच्या वा-याने खालच्या बाजूने उलटून बांधलेल्या दिशेने वर जावून महामार्गावर अडचण ठरत आहे, त्यामुळे सुसाट वेगाच्या या महामार्गावर दुचाकीस्वार व वाहनचालकांचा ताबा सुटून मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. मात्र, या अनधिकृत फ्लेक्स बोर्डवर कोणाचेच नियंत्रण नसून कार्यक्रमानंतर महिने उलटूनदेखील हे तसेच उभे राहतात त्यामुळे याचा मोठा त्रास येथील नागरिकांना व वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.
कुरकुंभ येथील मुख्य चौकातून बारामतीकडे जाताना पुलावरील एखादा फ्लेक्स कधी खाली पडेल याची शाश्वती नाही. बºयाच वेळा काही फ्लेक्स जोराच्या वाºयाने आजवर पडलेसुद्धा आहेत. मात्र, यातून काहीच बोध न घेता तसेच बिनधास्तपणे हे बोर्ड उभे असतात. पुलाखाली काही प्रमाणात छोटे व्यावसायिक बसलेले असतात त्यामुळे त्यांच्या जिवालादेखील धोका असून, त्यांच्या माध्यमातून येणाºया सामान्य ग्राहकांनादेखील याचा नाहक त्रास होत असतोच. अगदी नागरिकांच्या गर्दीच्या वेळेसदेखील हे बोर्ड पडल्याची उदाहरणे आहेत. मात्र, सुदैवाने यामध्ये अजून तरी कुठलीही इजा किंवा हानी झालेली नाही त्यामुळे एखाद्या घटनेची वाट पाहत बसण्यापेक्षा याबाबत उचीत कारवाई अत्यंत गरजेची असल्याचे ग्रामस्थ बोलत आहेत.
पुणे-सोलापूर महामार्ग नव्याने रुंदीकरण झाला तेव्हा या महामार्गादरम्यान असणाºया प्रत्येक गावाला भराव पूल बांधण्यात आले आहेत. त्यामुळे रोज हजारोंच्या संख्येने वाहने अगदी सुसाट वेगाने यावरून प्रवास करीत असतात. एकेरी वाहतूक असल्याकारणाने अवजड वाहनेदेखील वेगातच असतात अशातच महामार्गावर अचानक आडव्या येणाºया एखाद्या वस्तूचा अंदाज न आल्याने गंभीर अपघात झालेल्या घटना यापूर्वी या परिसरात झालेल्या असताना अशा प्रकारे निष्काळजीपणामुळे प्रवाशांच्या जिवाला वेठीस धरणे किती योग्य आहे. रात्रीच्या प्रवासावेळी तर याची गंभीरता आणखीनच वाढत असते.महामार्गावरील थोड्या प्रमाणात असणाºया वळणावरदेखील अचानक वाहन नियंत्रण करणे अत्यंत जिकिरीचे असल्याने अपघात होत आहेत.

कारवाई करण्यास उदासीनता
महामार्गावरील अशा बेकायदेशीर फ्लेक्सवर कारवाई करण्यासाठी यंत्रणा आहे मात्र ते कारवाई न करता फक्त निगराणी करीत आहेत. मात्र एखाद्याचा जीव गेल्यावरच यंत्रणेला जाग येते हे तर ठरलेलेच आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर असणाºया पाटस ते इंदापूरसाठी आपत्कालीन यंत्रणा काम करीत असते. परंतु ते देखील याकडे दुर्लक्ष करीत असतात किंव्हा मग स्थानिक फ्लेक्स असल्यामुळे व विविध जातीय धर्माचे, किंवा राजकीय क्षेत्राशी निगडित तर एखाद्या सामाजिक कार्यक्रमाचे देखील फ्लेक्स असल्याने कारवाई करणार तरी कोण, हादेखील एक प्रश्न त्यांच्या पुढे येत आहे.
या सर्व विषयावर येथील अधिकारी पवन सिंग यांनी सांगितले की, वारंवार नागरिकांना सांगूनदेखील कोणी ऐकत नाहीत.

महामार्ग अधिका-यांनी निर्णय घ्यावा
कुरकुंभच्या ग्रामपंचायतीमार्फत या फ्लेक्स बोर्ड लावण्यावर अजून तरी कुठलीही कर आकारणी केली जात नाही. अशा कर आकारणीची चर्चा मासिक सभेत झाली आहे मात्र यावर अजून कुठलाच निर्णय झालेला नाही. परिणामी संबंधित महामार्ग अधिकाºयांनी याबाबत निर्णय घ्यावा.
- रशीद मुलाणी
प्रभारी सरपंच, कुरकुंभ

Web Title: Pune-Solapur Highway: Dangerous Flex Board Fatality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.