पुण्यात खडकवासला धरण 100 टक्के भरले, शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीला पूर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 04:55 PM2017-09-20T16:55:16+5:302017-09-20T17:07:05+5:30

पुण्यात सध्या सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणे शंभर टक्के भरली असून बाकीची धरणे सुद्धा भरण्याच्या स्थितीत आहेत. शहरालगत असलेले खडकवासला धरण सुद्धा शंभर टक्के भरले आहे.

In Pune, the Khadakwasla Dam filled 100 percent, the river Mutha flowing through the city flooded it | पुण्यात खडकवासला धरण 100 टक्के भरले, शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीला पूर 

पुण्यात खडकवासला धरण 100 टक्के भरले, शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीला पूर 

googlenewsNext

पुणे, दि. 20 - पुण्यात सध्या सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणे शंभर टक्के भरली असून बाकीची धरणे सुद्धा भरण्याच्या स्थितीत आहेत. शहरालगत असलेले खडकवासला धरण सुद्धा शंभर टक्के भरले आहे. या धरणातून 23 हजार क्युसेक्सपेक्षा जास्त पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. एकंदरित पाहता मुठा नदीला पूर आल्याचे दिसते, कारण येथील भिडे पूल आणि त्याशेजारील नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली गेला आहे. तसेच, काही नदीपात्रात असलेली वाहने पाण्यात वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. 
मंगळवार (19 सप्टेंबर) पासून एकदा पावसाला दमदार सुरुवात झाली. त्यानंतर आजही दिवसभर कधी जोर तर कधी संतधार असा पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील धरणक्षेत्रात सुद्धा मुसळधार पाऊस पडल्याने 25 पैकी जवळपास 16 धरणे शंभर टक्के  भरली आहेत. यामध्ये खडकवासला, पानशेत आणि वरसगाव या धरणांचा समावेश आहे. खडकवासला धरणातून मुठेत 23 हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. या परिसरात पावसाची संततधार सुरूच असून, ती अशीच राहिल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वरसगाव धरणातूनही सोडलेले पाणी खडकवासल्यात येत आहे. धरणात जवळपास 25 हजार क्युसेक्स वेगाने पाणी जमा देखील होते आहे. त्यामुळे ही संततधार अशीच सुरु राहिल्यास विसर्ग वाढवावा लागणार आहे.


मुळा नदीतही मुळशी धरणातून पाणी येत असल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीच्या कडेला राहणाऱ्या रहिवाशांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे कोणतीही आपत्ती उद्भवल्यास महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या  202205501269/25506800/ 25506801/ 25506800/ 25506801/ 255006802/ 25506803/ 25506804 या क्रमांकावर, तसेच अग्निशमन दलाच्या मदतीसाठी 101 या क्रमांकावर, पोलीस यंत्रणेच्या मदतीसाठी 100 या क्रमांकावर, तसेच 020 25501133/ 25501130 या क्रमांकावर सुरक्षा रक्षकांच्या मदतीसाठी संपर्क करता येणार आहे. ही सेवा 24 तास सुरू आहे.
 

Web Title: In Pune, the Khadakwasla Dam filled 100 percent, the river Mutha flowing through the city flooded it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे