कडधान्य, तेलबियाही होणार नियमनमुक्त; शेतकऱ्यांना मिळणार बाजारभावापेक्षा जादा दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 06:59 PM2017-11-22T18:59:48+5:302017-11-22T19:06:13+5:30

शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेली तृणधान्ये, कडधान्ये आणि तेलबिया देखील आता नियमनमुक्त करण्यात येणार आहेत. यासाठी येत्या २८ नोव्हेंबर रोजी विशेष बैठक आयाजित करण्यात आली आहे.

Pulses, oil seeds to be regulated; farmers will get Excess rates | कडधान्य, तेलबियाही होणार नियमनमुक्त; शेतकऱ्यांना मिळणार बाजारभावापेक्षा जादा दर

कडधान्य, तेलबियाही होणार नियमनमुक्त; शेतकऱ्यांना मिळणार बाजारभावापेक्षा जादा दर

Next
ठळक मुद्देयेत्या २८ नोव्हेंबर रोजी आयाजित करण्यात आली विशेष बैठकया निर्णयानंतर शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा जादा दर मिळण्याचा मार्ग होणार मोकळा

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेली तृणधान्ये, कडधान्ये आणि तेलबिया देखील आता नियमनमुक्त करण्यात येणार आहेत. यासाठी येत्या २८ नोव्हेंबर रोजी विशेष बैठक आयाजित करण्यात आली असून, या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
राज्यातील तृणधान्ये, कडधान्ये तसेच तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा माल कोठेही विक्री करण्याचा मार्ग लवकरच खुला होणार आहे. भाजीपाला नियमनमुक्तीच्या निर्णयानंतर अडत, हमाली, तोलाई आणि बाजार समित्यांचा सेस अशा सगळ्या जाचातून मुक्तता झालेल्या शेतकरी वर्गाकडून कडधान्य, तृणधान्य आणि तेलबियासुद्धा नियमनमुक्त करण्याची मागणी जोर धरू लागली होती.
त्यादृष्टीने अभ्यास करण्यासाठी कृषी, फलोत्पादन व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीची मंगळवार (दि. २१) रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत यावर अंतिम निर्णय होणार होता, मात्र ती बैठक पुढे ढकलण्यात आली आहे़  संबंधित शेतमाल नियमनमुक्त करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असून या निर्णयानंतर शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा जादा दर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहेत.

Web Title: Pulses, oil seeds to be regulated; farmers will get Excess rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.