कोरेगाव भीमा येथील संघर्षाचा निषेध : हडपसर, मांजरीत बंदला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, January 04, 2018 3:17am

कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीमसागरात एका तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.

हडपसर - कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीमसागरात एका तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याला हडपसर, फुरसुंगी, ससाणेनगर, माळवाडी परिसरात प्रतिसाद मिळाला. दुकानदारांनी व्यवहार बंद ठेवून बंदमध्ये सहभाग घेतला. सकाळी दहापर्यंत सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते; मात्र साडेदहानंतर बंदला पाठिंबा दिला. पोलीस बंदोबस्त कडक असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. विविध संघटनांनी रॅली काढून हडपसर पोलीस ठाण्यामध्ये वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांना निवेदन दिले. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) आणि (आंबेडकर गट), जनता दल, संभाजी ब्रिगेड, बहुजन पार्टी (मायावती) आणि इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करून हडपसर पोलीस ठाण्यात नेला. या प्रसंगी रिपाइं (आठवले गट) पुणे शहराध्यक्ष शशिकला वाघमारे, हडपसर विधानसभा अध्यक्ष संतोष खरात, महादेव कांबळे, बाळ कांबळे, सागर खाडे, विठ्ठल सातव, विक्रम आल्हाट, गौतम शिंदे, नरेंद्र बनसोडे, प्रीतम धिवार, राजू कांबळे आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. भिडे, एकबोटे यांना अटक करण्याची मागणी निवेदनात म्हटले आहे, की कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमसागर लोटला होता. त्या वेळी हल्ल्यात एका तरुणाचा नाहक बळी गेला. त्याच्या निषेधार्थ हडपसरमधील पुरोगामी, आंबेडकरवादी संघटनांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, त्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर महाराष्ट्र बंद ठेवल्यामुळे राज्यामध्ये ठिकठिकाणी लाखो पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. हाच बंदोबस्त कोरेगाव भीमा येथे अगोदर ठेवला असता, तर दुर्दैवी घटना घडली नसती आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागला नसता. - शशिकला वाघमारे, अध्यक्षा- रिपाइं आठवले गट हडपसरमधील भीमसैनिकांनी शांततेत मोर्चा काढला आहे. कोरेगाव भीमा येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. तुमच्या भावना आणि मागण्या शासनापर्यंत पोहोचविल्या जातील. नागरिकांना त्रास होईल, असे वागू नका. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधान आणि घटनेनुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. - मिलिंद पाटील, सहायक पोलीस आयुक्त (वानवडी विभाग) भीमसैनिकांचे शिवरायांना अभिवादन मांजरी : मांजरी खुर्द येथे छत्रपती शिवाजीमहाराज चौक येथे छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या स्मारकाला मांजरीतील भीमसैनिकांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. ‘जय भवानी-जय शिवाजी’, ‘जय भीम’ अशा घोषणा देऊन वातावरण शांत करण्यात आले. तसेच, कोरेगाव भीमा येथे घडलेली घटना दुर्दैवी, निंदनीय असून त्याचा शांतपणे निषेध व्यक्त केला व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले.

संबंधित

कोरेगाव भीमा येथील बेपत्ता तरुणीचा मृतदेह सापडला
सलाम मलाला उर्दूतही!
शेतीला आवर्तन न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या   
पुणे : मार्केटयार्ड परिसरात आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव
पुण्यातही उभारणार व्यापार-उद्योग केंद्र, पीएमआरडीचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

पुणे कडून आणखी

कोरेगाव भीमा येथील बेपत्ता तरुणीचा मृतदेह सापडला
पाकशी चर्चा थांबविणे दुर्दैवी - दुलत
एअर एशियाचे पुणे -दिल्ली विमान रद्द,  प्रवाशांची गैरसोय; विमानतळावर गोंधळ
...अाणि त्यांनी घेतला अायुष्यातील स्वप्नं एकत्र बघण्याचा डाेळस निर्णय
सलाम मलाला उर्दूतही!

आणखी वाचा