सुरक्षारक्षकांची कपात ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, November 11, 2017 2:52am

प्रशासनाने महापालिका सुरक्षारक्षकांच्या संख्येत केलेली कपात आता ऐरणीवर आली आहे.

पुणे : प्रशासनाने महापालिका सुरक्षारक्षकांच्या संख्येत केलेली कपात आता ऐरणीवर आली आहे. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी प्रशासनाच्या पाठीशी थांबले असले, तरी विरोधातील राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना यांनी मात्र यावर रान उठवले आहे. सर्वसाधारण सभेत शुक्रवारी या विषयावरून त्यांनी गोंधळ घातला. महापालिकेने कंत्राटी स्वरूपात ठेकेदार कंपन्यांकडून तब्बल १ हजार ७०० सुरक्षारक्षक घेतले आहेत. त्यांतील अनेक जण राजकीय वरदहस्त असलेले होते. अनेक जण कामावर उपस्थित नसत. काही ठिकाणी गरज नसताना जास्त सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात आले होते. प्रशासनाने त्यावर बोट ठेवून तब्बल ९०० सुरक्षारक्षकांची कपात केली; मात्र त्यामुळे नगरसेवक संतापले. दोन महिन्यांपासून हा विषय महापालिकेत गाजत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसंत मोरे व साईनाथ बाबर हे सभागृहात सुरक्षारक्षकांचा गणवेश घालून आले होते. मोरे यांनी प्रशासनावर टीका केली. काही जण कामचुकार असतील, कामावर जात नसतील हे खरेही असेल; मात्र त्यांनाच कमी करण्याऐवजी सरसकट ९०० जणांना बेरोजगार करीत असल्यावर त्यांनी आक्षेप घेतले. इतकी वर्षे चालत होते; मग आताच त्यांची गरज कमी का झाली, असा प्रश्न त्यांनी विचारला. माजी उपमहापौर दीपक मानकर, वसंत मोरे, सुनीता वाडेकर आदींनी या विषयावरून प्रशासनाला धारेवर धरले. कायम शिपायांच्या ६०० पेक्षा जास्त जागा रिक्त असताना त्या भरल्या का जात नाहीत, अशी विचारणा मानकर यांनी केली. गफूर पठाण, अविनाश बागवे सुरक्षारक्षकांच्या निविदेबाबत काही बोलण्याचा प्रयत्न करीत होते; मात्र त्यांना महापौर मुक्ता टिळक यांनी थांबवले. त्यावरून बराच गोंधळ झाला. विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी मध्यस्थी करून सदस्यांना बोलू द्यावे, असे सांगितले. प्रकाश कदम यांनी वापरलेल्या एका शब्दावरून पुन्हा वाद झाला. मोरे व धीरज घाटे यांनी तो शब्द कामकाजातून काढण्यास सांगितले.

संबंधित

पुणे: लग्नास नकार दिल्याने युवकाची आत्महत्या, प्रेयसी महिला पोलिसानेही केला आत्महत्येचा प्रयत्न
शेजा-यांमध्ये सांडपाण्यावरून होता वाद, कोयत्याने वार करून खून
पुणे: बोपखेल प्रश्न सुटणार? उड्डाणपुलाला लष्कराकडून जागा
ऑफिसमध्ये प्रेम, रोमांस टाळा, इमेज खराब होऊ नये यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात
पिंपरीत कामगारांच्या पगारावर चोरट्यांचा डल्ला, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे कडून आणखी

खासगी बस आदळली ट्रॅक्टरवर; पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातात ६ जखमी
पुणे : वाळू माफियांनी जेसीबी मशिनखाली चिरडून शेतक-याची केली हत्या
घोडेस्वारीचा थरारक अनुभव; पुण्यातील रेसकोर्स येथे राष्ट्रीय घोडेस्वारी अजिंक्यपद स्पर्धा
पुणे : उरळी कांचन येथील लाकडी गोदामाला भीषण आग
भाजपा नगरसेवक तुषार कामठेला अटक, बनावट कागदपत्रांच्या आधारे निवडणूक लढल्याचं प्रकरण

आणखी वाचा