पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात ‘पब कल्चर’चा ताप; निर्माण होताहेत समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 03:11 PM2018-02-06T15:11:28+5:302018-02-06T15:16:19+5:30

कोरेगाव पार्क परिसरात गेल्या काही वर्षात सुरू झालेल्या ‘पब कल्चर’ चा नागरिकांना फार मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुकीपासून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, त्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली. 

The problem of 'Pub Culture' in the Koregaon Park area of ​​Pune; There are many problems that are being created | पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात ‘पब कल्चर’चा ताप; निर्माण होताहेत समस्या

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात ‘पब कल्चर’चा ताप; निर्माण होताहेत समस्या

googlenewsNext
ठळक मुद्देकोरेगाव पार्क पॉप्युलर हाइट येथे परिसरातील नागरिकांचा मेळावाकोरेगाव पार्क पोलीस चौकीचे उपनिरीक्षक अनंत रावडे यांचा करण्यात आला गौरव

पुणे : कोरेगाव पार्क परिसरात गेल्या काही वर्षात सुरू झालेल्या ‘पब कल्चर’ चा नागरिकांना फार मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुकीपासून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, त्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली. 
कोरेगाव पार्क समस्त नागरिक समिती व पुणे अगेन्स्ट क्राइमच्या वतीने कोरेगाव पार्क पॉप्युलर हाइट येथे परिसरातील नागरिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अनेक तक्रारी करण्यात आल्या. कोरेगाव पार्क पोलीस चौकीचे उपनिरीक्षक अनंत रावडे यांचा यावेळी राज्य सरकारचे सेवा पदक मिळाल्याबद्धल गौरव करण्यात आला. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पाटील आदी यावेळी उपस्थित होते. काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी, विजय जगताप, इब्राहिम शेख व जोशी काका यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पोलीस निरिक्षकांनी या समस्यांकडे लक्ष देण्यात येईल, असे आश्वासन दिले. 

Web Title: The problem of 'Pub Culture' in the Koregaon Park area of ​​Pune; There are many problems that are being created

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.