खासगी बस आदळली ट्रॅक्टरवर; पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातात ६ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 02:35 PM2017-11-17T14:35:59+5:302017-11-17T14:41:50+5:30

खासगी बसचा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर आदळून झालेल्या अपघातात ६ जण जखमी झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. सुदैवाने यात मोठी जीवितहानी टळली.

Private bus dashing on tractor; Six injured in accident on Pune-Solapur highway | खासगी बस आदळली ट्रॅक्टरवर; पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातात ६ जखमी

खासगी बस आदळली ट्रॅक्टरवर; पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातात ६ जखमी

Next
ठळक मुद्देबस चालकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने टळली मोठी जीवितहानी बऱ्याच वेळा लेन कटिंग करून दुसऱ्या बाजूवर जात असताना घडत आहेत अपघातऊस वाहतूक करणारी वाहने चुकीच्या दिशेने वाहतूक करतानाही पोलीस, आरटीओकडून कारवाई नाही

भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावर काळेवाडी गावच्या हद्दीत खासगी बसचा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर आदळून झालेल्या अपघातात ६ जण जखमी झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असल्याचे अपघाताचे स्वरूप पाहता दिसून आले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर काळेवाडी गावच्या हद्दीत सोलापूरहून पुण्याकडे येणाऱ्या खासगी बस नं. के. ए ०१ ए बी ५८७८ बस ची ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅकटरच्या दुसऱ्या ट्रेलरवर आदळल्याने हा अपघात घडला. हा अपघात इतका गंभीर होता की अपघातग्रस्त बस महामार्गाची सोलापूर-पुणे लेन सोडून डिव्हायडरवरून पुणे लेन ओलांडीत शेजारी असणाऱ्या सर्व्हिस रोड सोडून असणाऱ्या ऊसाच्या शेतात घुसली. यात बस ड्रायव्हरने प्रसंगावधान दाखवित गाडी पलटी होण्यापासून वाचविली. तसेच इतर वाहनांशी धडक न देता उसाच्या शेतात थांबविण्याचा प्रयत्न केला. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. 
पुणे-सोलापूर महामार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची समस्या वाढत असून दिवसाला एक अपघात घडत आहेत. ट्रॅक्टर चालविणारे ड्रायव्हर वाहनात जोराच्या आवाजाची गाणी ऐकत वेगाने ट्रॅक्टर चालवीत असल्याचे बऱ्याच वेळा दिसून येते. तर काही जन महामार्गावर दोन वाहनांत शर्यत लावतानाही दिसून येतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. बऱ्याच वेळा लेन कटिंग करून दुसऱ्या बाजूवर जात असताना अपघात घडत आहेत. तर याकडे आर. टी. ओ प्रशासन आणि महामार्ग पोलीस सोयीस्कररित्या दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अपघात घडत असून आजच्या अपघातात सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
पुणे-सोलापूर महामार्गावर बऱ्याच ठिकाणी ऊस वाहतूक करणारी वाहने चुकीच्या दिशेने वाहतूक करताना दिसून सुद्धा महामार्ग पोलीस आणि आरटीओ कारवाई करताना दिसून येत नाहीत. तसेच लोडचे कारण सांगून मुख्य मार्ग रस्त्याच्या मधोमध वाहने चालविली जात असल्याचेही बऱ्याच ठिकाणी दिसून येते. एका ट्रेलरला दुसरा आणि तिसरा ट्रेलर जोडीत रेल्वेसारखी साखळी वाहतूक मोकळ्या ट्रेलरची केली जात असताना बघ्याची भूमिका घेतली जात असल्याचे दिसून येते. तर कर्णकर्कश आवाजात गाणी लावत पाठीमागील वाहनांना साईट न देण्याचे प्रकारही सर्रास घडत आहेत. तसेच पंक्चर अथवा काही वाहनातील बिघाडामुळे रस्त्याच्या कडे ऐवजी मुख्य रस्त्यावरच दुरुस्ती केली जात असल्यामुळेही अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Private bus dashing on tractor; Six injured in accident on Pune-Solapur highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.