पुण्यातील प्रारंभ संस्थेच्या ‘वाट’ एकांकिकेने मिळवला साय फाय करंडकाचा मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:24 PM2017-12-26T12:24:28+5:302017-12-26T12:29:16+5:30

आयटी सुरक्षा उपाय पुरवठादार आणि क्विक हिल यांच्या संयुक्त विद्यमाने व पुणे शहर पोलीस यांच्या सहकार्याने भरत नाट्य मंदिर येथे साय फाय करंडक या एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले होते.

prarambha sanstha's 'wat' win cy-fi Trophy in pune | पुण्यातील प्रारंभ संस्थेच्या ‘वाट’ एकांकिकेने मिळवला साय फाय करंडकाचा मान

पुण्यातील प्रारंभ संस्थेच्या ‘वाट’ एकांकिकेने मिळवला साय फाय करंडकाचा मान

Next
ठळक मुद्देकरंडकाचे पहिले वर्ष असून सर्व एकांकिकेचे विषय सायबरशी निगडित सध्याच्या काळात सायबर लाइफ, सायबर सिक्युरिटी, वेब हे विषय महत्त्वाचे : अश्विनी गिरी

पुणे : तरुण पिढीला ज्ञान, कौशल्य मिळवण्यासाठी मोबाईल, कॉम्पुटर या माध्यमातून सायबरची गरज भासू लागली आहे. या सायबरच्या फायदे आणि गैरफायदे यावर उत्तम सादरीकरण करून प्रारंभ संस्थेच्या ‘वाट’ एकांकिकेने साय फाय करंडकाचा मान मिळवला आहे.
आयटी सुरक्षा उपाय पुरवठादार आणि क्विक हिल यांच्या संयुक्त विद्यमाने व पुणे शहर पोलीस यांच्या सहकार्याने भरत नाट्य मंदिर येथे साय फाय करंडक या एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत अनबॉक्स पुणेच्या फोर्थ डेमिनेशनने दुसरे स्थान मिळवले असून, तिसऱ्या स्थानी जकरंदा पुणेची ‘मिशन परफेक्शन’ ही एकांकिका आहे. हे करंडकाचे पहिले वर्ष असून यामध्ये सर्व एकांकिकेचे विषय सायबरशी निगडित होते. 
या वेळी क्विक हिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास काटकर, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी संजय काटकर, दिग्दर्शक सुनील सुकथनकर, गिरीश जोशी, अभिनेता सुयश टिळक, अभिनेत्री पर्ण पेठे, परीक्षक दिग्दर्शक अश्विनी गिरी, अभिनेता आलोक राजवाडे उपस्थित होते. साय फाय करंडकासाठी पुणे, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, गोवा आणि नागपूर या सहा केंद्रांचा समावेश होता. या सर्व केंद्रातून १०० संघांपैकी अंतिम फेरीसाठी २० संघांची निवड करण्यात आली. या अंतिम फेरीचे परीक्षण अश्विनी गिरी आणि आलोक राजवाडे यांनी केले. 
अश्विनी गिरी म्हणाल्या, सध्याच्या काळात सायबर लाइफ, सायबर सिक्युरिटी, वेब हे विषय सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत. 
पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन मंदार कुलकर्णी यांनी केले. प्रदीप वैद्य यांनी आभार मानले.

Web Title: prarambha sanstha's 'wat' win cy-fi Trophy in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे