अश्लील चाळे करणा-या शिक्षकाला पालकांकडून चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, November 11, 2017 2:40am

पारनेर तालुक्यातील निघोज येथील मुलिकादेवी विद्यालयात महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणा-या एका शिक्षकाला महाविद्यालयीन कामकाज सुरू असताना

टाकळीहाजी : पारनेर तालुक्यातील निघोज येथील मुलिकादेवी विद्यालयात महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणा-या एका शिक्षकाला महाविद्यालयीन कामकाज सुरू असताना पालक व विद्यार्थिनींना चांगलाच चोप दिला. यात हा शिक्षक जबर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोपान काळे असे या शिक्षकाचे नाव आहे. दरम्यान, महाविद्यालयीन प्रशासनाकडे पालकांनी तक्रार नोंदविली आहे. विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या पाच ते सहा मुलींशी हा शिक्षक वारंवार अश्लील चाळे करीत असत. तुमचे मोबाईल नंबर द्या; माझ्या मोबाईलवर फोन करा. तसेच या मुलींची छेड काढत होता. गेल्या महिनाभरापासून हा प्रकार सुरू होता. या विद्यार्थिनींनी पालकांना हा प्रकार सांगताच शुक्रवारी महाविद्यालय सुरू असताना या शिक्षकाला पुन्हा पालकांनी जाब विचारला. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त पालकांनी व उपस्थित विद्यार्थिनींनी चांगलाच चोप दिला. यामध्ये हा शिक्षक बेशुद्ध पडला. त्याच्यावर उपचार सुरू असले तरी या शिक्षकाची अवस्था गंभीर आहे. या घटनेची माहिती समजताच अनेक पालक व ग्रामस्थांनी महाविद्यालयात भेट देवून मुख्याध्यापकांशी तक्रार केली. मुख्याध्यापकांनी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेला याबाबत माहिती दिली. या शिक्षकावर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. रोडरोमिओ व विद्यार्थी यांचा त्रास सुरू असल्याने पालकांनी तक्रारी केल्या आहेत. आता शिक्षकांकङूनच मुलींना त्रास होत असेल तर आम्ही मुली शाळेत पाठवायच्या कशा? असा प्रश्न विचारला जात आहे.

संबंधित

दहावी-बारावीची कसोटी : काळजी नका करू, तुम्ही नापास होणार नाही !
पुणे-सोलापूर हायवेवर अपघात; 11 जण जखमी, चौघांची प्रकृती गंभीर
पुणे - कुलसचिव घेतात स्वतंत्र मानधन, देशातील एकमेव धक्कादायक प्रकार
दा-याघाटास लवकरच चालना देणार - विनोद तावडे
दडपण झुगारून जा परीक्षांना सामोरे!

पुणे कडून आणखी

बडोद्यातही मराठी शाळा ओस !
पालिकेच्या आरोग्य विभागातील पदोन्नती रखडणार
बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा, फसवणूक प्रकरण : फ्लॅट खरेदी व्यवहार
दा-याघाटास लवकरच चालना देणार - विनोद तावडे
दिव्यांगांना मिळणार घरपोच मोफत सुविधा

आणखी वाचा