डिजिटल इंडियाच्या युगात '' पोस्ट पेटी '' काळाच्या पडद्याआड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 05:16 PM2019-04-25T17:16:52+5:302019-04-25T17:21:04+5:30

जवानांपासून ते कंदीलाच्या प्रकाशात आपल्या मुलाच्या उत्तराची वाट पाहत बसलेली आखादी म्हताऱ्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना त्या पोस्टातल्या पत्राचा ध्यास लागलेला असायचा.

"Post Box" is behind the scenes of Digital India | डिजिटल इंडियाच्या युगात '' पोस्ट पेटी '' काळाच्या पडद्याआड

डिजिटल इंडियाच्या युगात '' पोस्ट पेटी '' काळाच्या पडद्याआड

googlenewsNext

रांजणगाव सांडस : लहानपणी नातेवाईकांचे आलेले पत्र वाचण्यात मोठी मजा होती. तसेच  पत्राला स्वत:च्या हाताने कुटुंबातल्या व्यक्तींच्या मनातील भावना स्वत:च्या हाताने पत्रात उतरवून पाठवलेले उत्तर अजूनही ठळकपणे नजरेसमोर येते. तसचे लग्नपत्रिका, दु:खद बातमी, आमंद वार्ता असे सगळेकाही चालायचे ते टपालपेटीमार्फत.. जवानांपासून ते कंदीलाच्या प्रकाशात आपल्या मुलाच्या उत्तराची वाट पाहत बसलेली आखादी म्हताऱ्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना त्या पोस्टातल्या पत्राचा ध्यास लागलेला असायचा.शहरापासून ते ग्रामीण भागातल्या छोट्या छोठ्या खेडे गावे वाड्या वस्त्यांना जोडणारा दुवा म्हणजे भारतीय टपालसेवेची टपाल पेटी '' डिजिटल इंडिया'' च्या युगात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. 
गावाकडे पोस्टमन पत्र घेऊन आला तर लोकांच्या मनामध्ये संमिश्र भावना दाटून येत असे. गावातला पोस्टमन आपल्या सुख दुःखाच्या बातम्या कळवतो म्हणून त्याच्यावर घरातल्या माणसाइतकाच प्रेम करायचे. तो ही मोबाईलच्या व्हाट्सअप ,फेसबुक यांच्या युगात फक्त एक आठवणींचा कप्पा बनून राहिल्या आहेत. पूर्वी नोकरीचे कॉल लेटर टपालाद्वारे घरपोच मिळत असे ,परंतु अलीकडील काळात ई-मेल ,मोबाईल, फेसबुक ,व्हाट्सअप च्या माध्यमातून मिळतात. त्यामुळे भारतीय टपाल सेवा गावाकडील भागात पूर्णपणे  बंद झाल्यात जमा झालेले आहे. 

मागील काही वर्षांपर्यंत ग्रामपंचायत सह सर्व सरकारी कार्यालयांतील कागद पत्रे ही पोस्ट मार्फत पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या कडे पाठविली जायची. परंतु,  अलिकडच्या  काळात इंटरनेट, व्हॉट्स, जीमेल यांच्या माध्यमातून ऑनलाईन माहिती त्वरित उपलब्ध झाल्यामुळे टपाल सेवा यांत्रिकीकरणाच्या युगात कमी झाली आहे. त्यामुळे गावांचा विकास योजना मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. .
सौ .शारदा श्यामकांत रणपिसे   (माजी आदर्श सरपंच राजन गाव सांडस )

Web Title: "Post Box" is behind the scenes of Digital India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.