Positive message will go to society - Chhatrapati SambhajiRaje | समाजात सकारात्मक संदेश जाईल - छत्रपती संभाजीराजे
समाजात सकारात्मक संदेश जाईल - छत्रपती संभाजीराजे

पुणे - शिवराज्याभिषेक हा राष्ट्रीय सण व्हावा, याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत. शिवराज्याभिषेक उत्सवाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे रायगडावर दरवर्षी फुलांची आकर्षक आरास केली जाते. त्यामुळे या सोहळ्याला देखणेपण आले आहे. शिवराज्याभिषेक लोकोत्सव होण्यात ‘दगडूशेठ’नेही मोलाचे योगदान दिले आहे.
त्यामुळे भविष्यातही शासनाने किल्ले दत्तक योजना सुरू केल्यानंतर ट्रस्टने यामध्ये सक्रिय सहभाग घेतल्यास समाजात सकारात्मक संदेश जाईल, असे मत कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या बाजीराव रस्त्यावरील गणेशोत्सव सजावट विभागाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, राजाभाऊ घोडके, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, अतुल चव्हाण, अक्षय गोडसे, राजेंद्र चिंचोरकर आदी उपस्थित होते. शिल्पकार विवेक खटावकर यांनी यंदाच्या सजावटीची माहिती दिली.

शिवराज्याभिषेक लोकोत्सव होण्यात ‘दगडूशेठ’नेही महत्त्वाचे योगदान दिले आहे. भविष्यातही शासनाने किल्ले दत्तक योजना सुरूकेल्यानंतर ट्रस्टने यामध्ये सक्रिय सहभाग घेतल्यास समाजाला सकारात्मक संदेश मिळेल, असे संभाजीराजे म्हणाले.

जगभर पोहोचणार काम
छत्रपती संभाजीराजे म्हणाले, ‘अनेक ठिकाणी सीएसआर निधी सामाजिक कामांसाठी वापरला जातो. भविष्यात किल्ले दत्तक योजना सुरु झाल्यानंतर अनेकांकडून हा निधी किल्ल्यांसाठी वापरणे देखील आवश्यक आहे.
दगडूशेठ गणपती ट्रस्टने पुढाकार घेतल्यास किल्ले संवर्धनाचा चांगला संदेश समाजात जाईल. किल्ल्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजीमहाराजांना जगभर पोहोचवण्याचे कामदेखील होणार आहे.’


Web Title:  Positive message will go to society - Chhatrapati SambhajiRaje
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.