महापालिकेच्या लोकसंख्येत झाली १० लाखांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 10:00 PM2019-04-26T22:00:00+5:302019-04-26T22:00:02+5:30

गेल्या दोन वर्षांत शहराच्या लोकसंख्येत तब्बल १० लाखांना वाढ होऊन ती ५० लाखांवर गेली आहे.

The population of the municipal population increased by 10 lakh | महापालिकेच्या लोकसंख्येत झाली १० लाखांची वाढ

महापालिकेच्या लोकसंख्येत झाली १० लाखांची वाढ

Next
ठळक मुद्देमहानगरपालिकेच्या अतिरिक्त पाणी वापरा विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल पाषाण, कात्रज तलावाचा वापर शक्य नाही !

पुणे : काही महिन्यांच्या अंतराने पुणे शहराच्या लोकसंख्येत लाखांची भर पडत आहे. गेल्या दोन वर्षांत शहराच्या लोकसंख्येत तब्बल १० लाखांना वाढ होऊन ती ५० लाखांवर गेली आहे. पुणे शहराला सध्या मंजुर असलेला वार्षिक कोटा ११.५० अब्ज घनफुटावरुन (टीएमसी) १५.८५ टीएमसी मिळावा यासाठी लोकसंख्येची गणिते वारंवार बदलली जात आहेत. पाण्याची गळती, व्यावसायिक, औद्योगिक पाणी वापर, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, हॉटेल्स आणि हॉस्पिटलचा पाणी वापर गृहीत धरुन वाढीव पाणी कोटा देण्याची गरज असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. 
महानगरपालिकेच्या अतिरिक्त पाणी वापरा विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल झाली आहे. महाराष्ट्र सरकार आणि महापालिका प्रतिवादी आहेत. त्यात महापालिकेने आपली बाजू मांडताना लोकसंख्या आणि त्यासाठी आवश्यक पाण्याची माहिती दिली आहे. या पुर्वी सप्टेंबर २०१७मध्ये पुणे शहराला लोकसंख्येच्या नुसार वार्षिक ८.१९ टीएमसी (दररोज ६३५ एमएलडी) पाणी वापरास महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मंजुरी दिली होती. त्यानंतर खडकवासला प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या ४ ऑक्टोबर २०१८ रोजी झालेल्या बैठकीत पुणे शहराला वार्षिक ११.५० टीएमसी (दररोज ८९२ एमएलडी) पाणी देण्याचा निर्णय झाला. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर शहराला पाणी कमी देणे परवडणारे नसल्याने, राज्य सरकारने १३०० ते १३५० दशलक्ष लिटर पाणी वापराची सूचना दिली होती. सध्या शहराचा पाणी वापर १३०० ते १४०० एमएलडी दरम्यान आहे. हा पाणी वापर वार्षिक सोळा ते साडेसोळा टीएमसी होतो. 
महापालिकेने पाणी वापराची गरज अधोरेखित करताना ३५ ते ४० टक्के होत असलेली पाणी गळती, महापालिकेला शहर हद्दीलगतच्या ५ किलोमीटर अंतरातील गावांना करावा लागणारा पाणी पुरवठा, शहरातील वाढलेली लोकसंख्या, समाविष्ट गावे, शाळा-महाविद्यालये, हॉस्पिटल्स, विमानतळ, पोलीस स्टेशन, फायर ब्रिगेड, तसेच मोठ्या सोसायट्यांना अग्नीशमनासाठी ठेवावा लागणारा राखीव पाण्याचा कोटा, दहा टक्के तरती लोकसंख्या (फ्लोटींग पॉप्युलेशन) याचा विचार केल्यास शहराला ११.५० टीएमसी पाणी देणे शक्य नाही. शहराची तहान भागविण्यासाठी दररोज किमान १२३० एलएलडी (वार्षिक १५.८५ टीएमसी) पाणी आवश्यक असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. 
----------------------

पाषाण, कात्रज तलावाचा वापर शक्य नाही !
शहर हद्दी लगत असलेल्या पाषाण आणि कात्रज येथील तलावांची क्षमता ही अत्यंत तोकडी आहे. तसेच, या तलावांमध्ये मैलापाणी सोडले जात असल्याने हे पाणी वापरण्यास अयोग्य असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. 


 

Web Title: The population of the municipal population increased by 10 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.