कोरेगाव भीमामध्ये दगडफेक, जाळपोळ, परिस्थिती नियंत्रणात; तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 05:31 AM2018-01-02T05:31:23+5:302018-01-02T12:04:10+5:30

पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे.

 Polling, arson, and situation in Koregaon Bhima; The death of the youth | कोरेगाव भीमामध्ये दगडफेक, जाळपोळ, परिस्थिती नियंत्रणात; तरुणाचा मृत्यू

कोरेगाव भीमामध्ये दगडफेक, जाळपोळ, परिस्थिती नियंत्रणात; तरुणाचा मृत्यू

googlenewsNext

कोरेगाव भीमा (जि. पुणे) : पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेचे पडसाद मराठवाड्यातही उमटले. नगर-पुणे रस्त्यावर राज्य राखीव दलाच्या ६ कंपन्या तैनात केल्या आहेत.
वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झाले.

मोठा अनर्थ टळला

विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येणार असल्याने पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक पोलिसांनी वळविली होती. पुण्याकडे येणारी वाहतूक न्हावरा फाटामार्गे सोलापूर रस्त्याकडे, शिक्रापूरमार्गे चाकणकडे, कोरेगाव भीमा येथून चौफुल्याकडे वळविण्यात आली. पुण्याकडून येणारी वाहतूक खराडीमार्गे सोलापूर रोडने न्हावरामार्गे नगरकडे, विश्रांतवाडीमार्गे चाकणकडे वळविली होती. तरीही पुणे नगर रस्त्यावर कोंडी झाली.

Web Title:  Polling, arson, and situation in Koregaon Bhima; The death of the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.