कोरेगाव भीमा मुद्यावरून पुण्यात राजकारण पेटले :काँग्रेसची भाजपवर विखारी टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 09:10 PM2018-04-25T21:10:37+5:302018-04-25T21:10:37+5:30

कोरेगाव भीमा मुद्दावरून पुण्यात चांगलेच राजकारण पेटले असून बुधवारी भाजपचे खासदार माजी प्रदीप रावत यांनी सत्यशोधन समितीच्या अहवालावर शहर काँग्रेसतर्फे पत्रक काढून टीका करण्यात आली आहे.

Politics in Pune on the issue of Koregaon Bima: Congress |  कोरेगाव भीमा मुद्यावरून पुण्यात राजकारण पेटले :काँग्रेसची भाजपवर विखारी टीका 

 कोरेगाव भीमा मुद्यावरून पुण्यात राजकारण पेटले :काँग्रेसची भाजपवर विखारी टीका 

googlenewsNext
ठळक मुद्दे कोरेगाव भीमा मुद्द्यावरून पुण्यात राजकीय युद्धाला सुरुवात सरकारचे अपयश झाकण्यासाठी पोलिसांवर आरोप, काँग्रेसची भाजपवर टीका 

 

पुणे :  कोरेगाव भीमा मुद्दावरून पुण्यात चांगलेच राजकारण पेटले असून बुधवारी भाजपचे खासदार माजी प्रदीप रावत यांनी सत्यशोधन समितीच्या अहवालावर शहर काँग्रेसतर्फे पत्रक काढून टीका करण्यात आली आहे. भाजप सरकारने स्वतःचे अपयश झाकण्यासाठी पोलिसांवर खापर फोडले असल्याची टीका शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केली आहे. 

    भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत यांनी सत्यशोधन समितीने कोरेगाव भीमा येथे  १ जानेवारी २०१८रोजी झालेल्या तयार केलेला अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात  हा माओवादी विचारांच्या संघटना,खोटा इतिहास पसरवून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या फुटीरतावादी गट याचा पूर्वनियोजित कट होता,यात आंबेडकरी व हिंदुत्ववादी गटाचा  यामध्ये काहीही संबंध नाही असा निष्कर्ष मांडण्यात आला. त्यावेळी रावत यांनी बोलताना पोलिसच या हिंसाचाराला जबाबदार असून वढू येथून तीन किलोमीटर भगवे झेंडे घेऊन कोरेगांव भीमाकडे जाणार्‍या जमावाला पोलिसांनी वेळीच रोखून जमावातील लोकांना इतर ठिकाणी हालविले असते तर कोरेगांव भीमा येथील हिंसाचार टळला असता असे सांगितले. परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, पुणे ग्रामीण पोलिस आधिक्षक आणि शहर पोलिस आयुक्तांनी याप्रकरणामध्ये राज्य शासनाची दिशाभूल केली आहे, असा आरोप ही त्यांनी केला होता.

      या आरोपाला पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने उत्तर देण्यात  असून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक हे अल्पसंख्यांक समाजचे असल्यामुळे त्यांच्यावर जाणूनबुजून खापर फोडले जात असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. आपल्या पक्षाच्या सरकारचे अपयश झाकण्यासाठी  जजाणून बुजून भाजपचे खासदार त्यांना बदनाम करत आहेत व जनतेची दिशाभूल करण्यासाठी नक्षलवाद्यांनी ही दंगल घडवून आणली असा आरोप करत आहेत  असेही काँग्रेसच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या हिंसाचारात मृत्यमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री भेटले नसून पालकमंत्रीही गिरीश बापटही ही परिस्थिती हाताळण्यास अयशस्वी ठरल्याचेही यात म्हटले आहे. थेट सत्ताधारी भाजपवर काँग्रेसने केलेल्या आरोपामुळे आता हा विषय अधिक संवेदनशील बनत चालला असून शुक्रवारपर्यंत इतर राजकीय पक्षही त्यात उडी मारण्याची शक्यता आहे. 

 

 

 

 

 

Web Title: Politics in Pune on the issue of Koregaon Bima: Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.