शाळा- महाविद्यलयांच्या परिसरात तंबाखुजन्य पदार्थ विकणाऱ्यांना पाेलिसांनी केले ''ऑल आऊट''

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 03:13 PM2019-01-29T15:13:14+5:302019-01-29T15:16:14+5:30

शाळा- महाविद्यलयांच्या परिसरात तंबाखुजन्य पदार्थ विकणाऱ्या तब्बल 173 जणांवर पाेलिसांनी कारवाई केली.

police took action against tobacco sellers near school and colleges | शाळा- महाविद्यलयांच्या परिसरात तंबाखुजन्य पदार्थ विकणाऱ्यांना पाेलिसांनी केले ''ऑल आऊट''

शाळा- महाविद्यलयांच्या परिसरात तंबाखुजन्य पदार्थ विकणाऱ्यांना पाेलिसांनी केले ''ऑल आऊट''

Next

पुणे : सिगारेट व अन्य तंबाखजन्य उत्पादने अधिनियम सन 2003 च्या कलम 6 (ब) नुसार शैक्षणिक संस्थांच्या 100 यार्ड परिसरात तंबाखुजन्य उत्पादने विकण्यास मनाई आहे. असे असले तरी पुण्यातील अनेक शाळा- महाविद्यालयांच्या जवळील परिसरात सर्रासपणे सिगारेट, तंबाखुजन्य पदार्थांची विक्री केली जाते. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी देखील पाेलिसांच्या गुन्हे शाखेला प्राप्त झाल्या हाेत्या. पाेलिसांनी 28 जानेवारी राेजी धडक कारवाई करत तब्बल 173 जणांवर कारवाई केली. 

शहरातील अनेक शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात पान टपऱ्यांमधून बिडी, सिगारेट, गुटखा, तंबाखु अशा विविध तंबाखुजन्य पदार्थांची विक्री केली जात असल्याच्या अनेक तक्रारी गुन्हे शाखेला प्राप्त झाल्या हाेत्या. त्यामुळे 28 जानेवारी राेजी गुन्हे शाखेनी धडक कारवाई केली. शहरातील खडक, फरासखाना, समर्थ, विश्रामबाग, शिवाजीनगर, डेक्कन, लष्कर, बंडगार्डन, काेरेगाव पार्क, स्वारगेट, सहकारनगर, भारती विद्यापीठ, सिंहगड, चतुःश्रृंगी, खडकी, काेथरुड, वारजे-माळवाडी, हडपसर, काेंढवा, वानवडी, येरवडा, चंदननगर, विश्रांतवाडी, विमानतळ, अशा 24 पाेलीस ठाण्याच्या हद्दीत ''ऑल आऊट ऑपरेशन'' राबवण्यात आले. यात शाळा -महाविद्यलयांच्या हद्दीत तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या 173 जणांवर कारवाई करण्यात आली. 2018 मध्ये अशा प्रकारची कारवाई करण्यात आली हाेती. त्यावेळई 315 जणांवर कारवाई केली हाेती. 

 भविष्यात शहरातील शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात पान टपऱ्यांमधून बिडी, सिगारेट, गुटखा, तंबाखु अशा विविध तंबाखुजन्या पदार्थांची ग्राहकांना विक्री हाेऊ नये म्हणून, ज्या इसमांवर यापुर्वी कारवाई केलेली आहे. अशा इसमांचे पानटपरीचे परवाने रद्द करण्याबाबत पुणे महानगरपालिकेला कळविण्यात येणार असल्याचे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले आहे. 

Web Title: police took action against tobacco sellers near school and colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.