दोन गावांमध्ये पोलीस कारवाई : जुगार खेळताना ९ जणांना पकडले  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 02:58 AM2017-12-31T02:58:18+5:302017-12-31T02:58:30+5:30

निरगुडसर आणि एकलहरे (ता. आंबेगाव) गावात जुगार खेळणाºया नऊ जणांना पोलिसांनी जागीच पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरगुडसरमध्ये तीन पत्याचा जुगार खेळताना पोलिसांनी सहा जणांना पकडले. याप्रकरणी सहा जणांविरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Police action in two villages: 9 people caught playing in gambling | दोन गावांमध्ये पोलीस कारवाई : जुगार खेळताना ९ जणांना पकडले  

दोन गावांमध्ये पोलीस कारवाई : जुगार खेळताना ९ जणांना पकडले  

Next

मंचर : निरगुडसर आणि एकलहरे (ता. आंबेगाव) गावात जुगार खेळणाºया नऊ जणांना पोलिसांनी जागीच पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरगुडसरमध्ये तीन पत्याचा जुगार खेळताना पोलिसांनी सहा जणांना पकडले. याप्रकरणी सहा जणांविरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी निलेश डुंढा किर्वे (वय २६ रा. निरगुडसर) दत्तु बाबुराव धर्म (वय ५८ रा. लाखणगाव) किसन रामभाऊ खिलारी, शंकर महादेव लबडे (वय ४५) संजय पोपट पवार (वय ४० सर्व रा. निरगुडसर) व ज्ञानेश्वर विमल गावडे (वय २२ रा. गावडेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कर्मचारी पुंडलिक मराडे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
दरम्यान, पुणे नाशिक महामार्गावर एकलहरे गावच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेलमध्ये मटका खेळणाºया तिघांना पोलिसांनी जागीच पकडले. याप्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एकलहरे गावच्या हद्दीत बेकायदा बिगरपरवाना लोकांकरवी मोबाईलवरून कल्याण मटका नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती खात्रीशीर बातमी मिळाली.
पोलिसांनी पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या हॉटेलमध्ये छापा टाकला. त्या हॉटेलमध्ये संतोष दत्तात्रय पवार (वय ३५ रा. एकलहरे) सुशांत भालचंद जाधव (वय ३०रा. मंचर) व तुषार उर्फ बाबु दगडु निघोट (वय २१ रा. निघोटवाडी) हे जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी त्यांना पकडले. यासंदर्भात पोलिस कॉन्स्टेब्ल शिवाजी चितारे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मंचर पोलीस करीत आहेत.

निरगुडसर गावच्या हद्दीत मटक्याच्या जुगारीची साधने बाळगून पैशाच्या हार-जीतवर पत्त्याचा जुगार काहीजण खेळत असल्याची खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली. पोलीस कर्मचारी एस.एस.गायकवाड, एन.डी.नाईकडे व पंच तेथे गेले असता सहा जणांना पोलिसांनी जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडे रोख ४ हजार ६८० रुपये तसेच पत्त्यांचा कॅट व इतर साहित्य मिळून आले.

Web Title: Police action in two villages: 9 people caught playing in gambling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.