प्लस व्हॅली, अंधारबन ‘बंद’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 03:46 PM2019-07-06T15:46:59+5:302019-07-06T15:54:31+5:30

पर्यटकांच्या बेजबाबदारपणा आणि बेशिस्तमुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे.

Plus Valley, andharban '' Close" | प्लस व्हॅली, अंधारबन ‘बंद’

प्लस व्हॅली, अंधारबन ‘बंद’

Next
ठळक मुद्देपर्यटनाच्या नावाखाली चाललेल्या स्वैराचाराने पर्यावरणाची हानी बेताल वर्तन करणाऱ्यांवर व नियम तोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई

गोरख माझिरे । 
भूगाव : पश्चिम घाटातील जैवविविधता व पर्यावरण यांच्या संवर्धनाकरिता वनविभागाने पुढाकार घेतला आहे. याचा भाग म्हणून पश्चिम घाटांतर्गत येणाऱ्या ताम्हिणी वन्यजीव अभयारण्यामधील प्लस व्हॅली आणि सुधागड वन्यजीव अभयारण्य भागातील अंधारबन भागात पर्यावरणाच्या दृष्टीने ठरवून देण्यात आलेल्या अतिसंवेदनशील भागात १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात येणार आहे.  
 याविषयी अधिक माहिती देताना ताम्हिणी वनपरिक्षेत्र विभागाचे वनअधिकारी अंकिता तरडे म्हणाल्या, पश्चिम घाटातील पर्यटकांच्या बेजबाबदारपणा आणि बेशिस्तमुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. या भागातील महत्त्वाची जैवविविधतादेखील नष्ट झाली आहे. तसेच पर्यटनाच्या नावाखाली चाललेल्या स्वैराचाराने पर्यावरणाची हानी होत असल्याने प्रशासनाने त्यावर कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यापुढील काळात या परिसरात बेताल वर्तन करणाऱ्यांवर व नियम तोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
२०१३ च्या राज्य वनविभागाच्या अधिनियमानुसार ताम्हिणी घाटातील अभयारण्याची नोंद आहे. ४९.६२ चौ.कि.मी. एवढे क्षेत्रात विस्तारलेल्या हे अभयारण्य वेगवेगळ्या १२ भागांत विभागले असून पुणे वनविभागात येतात. या अभयारण्यात सस्तन प्राण्यांच्या २५ प्रजाती आहेत. विशेष म्हणजे यात महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’ याचाही समावेश आहे. याबरोबरच बिबट्या, भेकर हे देखील या परिसरात आढळतात. १५० हून अधिक पक्ष्यांच्या जाती आणि फुलपाखरांच्या ७० पेक्षा अधिक प्रजातींचे अस्तित्व आहे. 
..............
४घनदाट जंगल अशी ओळख असलेल्या अंधारबन हे जंगल ताम्हिणी घाटाच्या मध्यवर्ती भागापासून १३ किमी अंतरावर आहे. पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे. येथे सातत्याने हौशी पर्यटकांची वर्दळ सुरू असते. दरवर्षी पावसाळ्याच्या दरम्यान येथील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. काही खासगी ट्रेकर संस्था या ठिकाणी ट्रेकिंगचे आयोजन करतात. साप्ताहिक सुटीच्या दिवशी हजारो पर्यटकांची गर्दी या भागात पाहवयास मिळते. 
.............
पर्यटकाकडून वनविभागाच्यावतीने नमूद केलेल्या कुठल्याही नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. याशिवाय त्यात दोषी आढळल्यास पर्यटक अथवा संबंधित सहल आयोजकाला शिक्षेला सामोरे जावे लागेल. - अंकिता तरडे (वनअधिकारी, ताम्हिणी अभयारण्य)

Web Title: Plus Valley, andharban '' Close"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.