'तिच्या सतरा प्रकरणांची' चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 09:25 PM2018-03-24T21:25:31+5:302018-03-24T21:25:31+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या माध्यमातून प्रत्येक सत्राला एका अतिथी दिग्दर्शकाला बाेलावून विद्यार्थ्यांचे नाटक बसविण्यात येते. यंदा अभिनेता-दिग्दर्शक असलेल्या अालाेक राजवाडे याला बाेलाविण्यात अाले हाेते. त्याने 'तिची सतरा प्रकरणे' हे नाटक बसविले.

the play tichi satra prakarne performed by lalit kala students | 'तिच्या सतरा प्रकरणांची' चर्चा

'तिच्या सतरा प्रकरणांची' चर्चा

Next

पुणे : सभागृह भगच्च भरलं हाेतं. खुर्च्या अपुऱ्या पडल्या म्हणून अनेकांनी खालीच बसून घेतले. अापले माेबाईल वाजायला नकाे म्हणून प्रत्येकाने अावर्जुन अापले माेबाईल बंद केले. तिसरी घंटा झाली अाणि सभागृहात निरव शांतता पसरली. अन सुरु झाला तिच्या सतरा प्रकरणांची चर्चा. 

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी तिची सतरा प्रकरणे हे नाटक शुक्रवारी  विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात सादर केले. मूळ मार्टीन क्रिम्प या लेखकाने लिहिलेल्या या नाटकाचा मराठी अनुवाद प्रदीप वैद्य यांनी केला अाहे. तर हे नाटक अभिनेता-दिग्दर्शक अालाेक राजवाडे याने अतिथी दिग्दर्शक म्हणून दिग्दर्शित केले. विद्यापीठातील ललित कला केंद्राद्वारे एका अतिथी दिग्दर्शकाला अामंत्रित करुन केंद्राच्या विद्यार्थ्यांना घेऊन नाटक बसविले जाते. यंदा अालाेक राजवाडे याला अामंत्रित करण्यात अाले हाेते. अालाेकने या विद्यार्थ्यांसाठी तिची सतरा प्रकरणे या नाटकाची निवड केली. 
    'अाशी' या पात्रावर हे नाटक जरी असले तरी ही अाशी नेमकी काेण याचा शाेध हा प्रेक्षकांना घ्यायचा अाहे. अापल्या अासपासची लाेकं ही प्रत्येक गाेष्टीवर प्रतिक्रीया देत असतात, मग त्यात त्यांचा संबंध असाे वा नसाे. त्यांना फक्त रिअॅक्ट व्हायचे असते. एखाद्या व्यक्ती बद्दल केलेली विविध पद्धतीची चर्चा ही त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही तीचे व्यक्तीमत्व घडवत असते. मात्र यातून खरं काय नि खाेटं काय याचा अापल्याला शेवटपर्यंत शाेध लागत नाही. अाशी या पात्राविषयी सतरा वेगवेगळ्या पद्धतीने हाेणारी चर्चा, अाराेप, बडबड याची मांडणी या नाटकात करण्यात अाली अाहे. ही अाशी काेणीही असू शकते. ती चर्चेच्या माध्यमातून अापल्या सगळ्यांच्या अायुष्यात येत असते. 
    उत्कृष्ट सादरीकरण अाणि दमदार अभिनयाने या नाटकाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले अाहे. अालाेकने त्याच्या दिग्दर्शकीय काैशल्याचा वापर करत प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडले अाहे. या उपक्रमाच्या निमित्ताने ललित कलाच्या विद्यार्थ्यांना अापल्या अभिनय काैशल्याचा अाढावा घेता अाला. विद्यार्थ्यांचे कष्ट अाणि त्यांचे नाटकावरचे, कलेवरचे प्रेम यातून समाेर अाले. 

Web Title: the play tichi satra prakarne performed by lalit kala students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.