नगर रचनाकार भरतीत डावलण्याचे‘प्लॅनिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 07:35 PM2018-03-15T19:35:18+5:302018-03-15T19:35:18+5:30

राज्याच्या नगर विकास विभागाकडून आयोगामार्फत सहाय्यक नगर रचनाकारची १७२ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी दि. ९ ते ३१ मार्च या कालावधीत पात्र उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज भरता येणार आहेत.

planning to ditch students in town planner recruiment | नगर रचनाकार भरतीत डावलण्याचे‘प्लॅनिंग’

नगर रचनाकार भरतीत डावलण्याचे‘प्लॅनिंग’

Next
ठळक मुद्देटाऊन प्लॅनिंग पदवीच्या विद्यार्थ्यांचा आरोपयावर्षी पहिल्यांदाच पात्रतेमध्ये अर्बन प्लॅनिंगचा समावेशअंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनाही पदभरतीत स्थान मिळावे,विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहाय्यक नगर रचनाकार पदासाठी सुरू असलेल्या भरतीप्रक्रियेत नगर रचना पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांना डावलले जात आहे. अभियांत्रिकी व आर्किटेक्टरच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच अधिक संधी मिळावी, हा त्यामागे उद्देश असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून होत आहे. याबाबत पुण्यातील काही विद्यार्थी शुक्रवारी (दि.१६) आयोगाकडे गाऱ्हाणे मांडणार आहेत. 
राज्याच्या नगर विकास विभागाकडून आयोगामार्फत सहाय्यक नगर रचनाकारची १७२ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी दि. ९ ते ३१ मार्च या कालावधीत पात्र उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज भरता येणार आहेत. या पदासाठी सिव्हील इंजिनिअरींग किंवा सिव्हीव अ‍ॅन्ड रुरल इंजिनिअरींग किंवा अर्बन अ‍ॅन्ड रुरल इंजिनिअरींग किंवा आर्किटेक्टर किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी किंवा अर्बन प्लॅनिंग या शाखांची पदवी ही शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. तसेच पदवी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. यावर सध्या नगर रचना या पदवी अभ्यासक्रमात अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आयोगाच्या इतर पदभरती प्रक्रियेमध्ये केवळ कोणत्याही शाखेच्या पदवीबरोबरच अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येते. आयोगाच्या परीक्षेर्वी पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक असते. हाच निकष नगर रचनाकार पदासाठीही लावण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या पदासाठी खुप वर्षांनंतर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. पुर्वी केवळ अभियांत्रिकी व आर्किटेक्चर उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच परीक्षेसाठी ग्राह्य धरले जात होती. यावर्षी पहिल्यांदाच पात्रतेमध्ये अर्बन प्लॅनिंगचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ही पदवीच्या अंतिम वर्षात असलेल्यांना मोठी संधी आहे. राज्यात केवळ पुण्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ही पदवी आहे. त्यामुळे ही पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी खुप कमी आहेत. तसेच खुप वर्षांनंतर ही भरती होत आहे. ही संधी गेल्यानंतर पुन्हा लवकर संधी मिळणार नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यांसदर्भात पुण्यातील काही विद्यार्थी आयोगाला मागण्यांचे निवेदन देणार आहेत. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनाही पदभरतीत स्थान मिळावे, ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे.
----------
सहाय्यक नगर रचनाकार या पदासाठी टाऊन प्लॅनिंगच्या विद्यार्थ्यांनाच अधिक प्राधान्य मिळायला हवे. पूर्वी या पदवीचे विद्यार्थी मिळत नव्हते. म्हणून अभियांत्रिकी व आर्किटेक्चर ही पात्रता ग्राह्य धरली जात होती. मात्र, आता टाऊन प्लॅनिंगचे पदवीधर आहे. तसेच आॅनलाईन अर्ज भरतानाही केवळ प्लॅनिंग असा उल्लेख असल्याने गोंधळ उडत आहे. राज्यात केवळ टाऊन प्लॅनिंगची पदवी मिळते. त्यामुळे आपण पात्र ठरणार की नाही, याबाबत उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.
- अपुर्वा गांधी 
...
टाऊन प्लॅनिंग पदवीधर अभियांत्रिकी व आर्किटेक्चर अभ्यासक्रमामध्ये अर्बन प्लॅनिंगचे शास्त्रशुध्द शिक्षण मिळत नाही. टाऊन प्लॅनिंगचे विद्यार्थी चार वर्ष याचेच शिक्षण घेतात. मात्र, पदभरतीत त्यांना डावलले जात आहे. प्रत्यक्षात या विद्यार्थ्यांनाच अधिक प्राधान्य मिळायला हवे. प्लॅनिंगच्या अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांनाही संधी देण्याची गरज आहे. किंवा ही भरती प्रक्रिया दोन महिने पुढे ढकलल्यास अंतिम वर्षातील विद्यार्थीही पात्र ठरू शकतील.
- प्रा. प्रताप रावळ, समन्वयक
टाऊन प्लॅनिंग विभाग, सीओईपी

Web Title: planning to ditch students in town planner recruiment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.