फिनिक्स मॉलने पुष्पगुच्छ देऊन केले तृतीयपंथीयांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 06:04 PM2018-03-20T18:04:15+5:302018-03-20T18:04:15+5:30

फिनिक्स माॅलमध्ये तृतीयपंथी असलेल्या साेनाली दळवी यांना प्रवेश नाकारण्यात आलेल्या घटनेचा निषेध झाेपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने करण्यात आला. तसेच तृतीयपंथीयांना अाेवाळत त्यांच्यासाेबत फिनिक्स माॅलमध्ये प्रवेश करण्यात अाला.

Phoenix mall welcomed transgenders by giving floral bouquets | फिनिक्स मॉलने पुष्पगुच्छ देऊन केले तृतीयपंथीयांचे स्वागत

फिनिक्स मॉलने पुष्पगुच्छ देऊन केले तृतीयपंथीयांचे स्वागत

ठळक मुद्देझाेपडपट्टी सुरक्षा दलाच्यावतीने करण्यात अाले अांदाेलनतृतीयपंथीयांना अाेवाळत करण्यात आला फिनिक्स माॅलमध्ये प्रवेश

पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी तृतीयपंथी असलेल्या सोनाली दळवी यांना फिनिक्स मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. त्याच्या निषेध म्हणून झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने तृतीयपंथीयांचे औक्षण करत फिनिक्स मॉलमध्ये प्रवेश करत आंदोलन करण्यात आले. मॉल प्रशासनाच्यावतीने पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच अशी घटना पुन्हा घडणार नाही, अशी ग्वाही देण्यात आली. 
    सोनाली दळवी या त्यांच्या मित्रासोबत फिनिक्स मॉलमध्ये गुढीपाडव्यासाठी खरेदी करण्यासाठी गेल्या असता त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच माध्यमांमधून मॉल प्रशासनावर टीका करण्यात येत होती. या प्रकाराबाबत मॉल प्रशासनाने माध्यमांकडे दिलगीरी व्यक्त केली होती. मंगळवारी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक-अध्यक्ष भगवान वैराट यांच्या नेतृत्वाखाली तृतीयपंथीयांसोबत फिनिक्स मॉलमध्ये प्रवेश करण्यात आला. 
    यावेळी पोलीसांचाही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मॉलचे व्यवस्थापक आनंद भालेराव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देत तृतीयपंथीयांचे स्वागत करण्यात आले. तसेच यापुढे अशी घटना घडणार नाही अशी ग्वाही देण्यात आली. यावेळी बोलताना भगवान वैराट म्हणाले, तृतीयपंथी व्यक्तींना माणूस म्हणून जगण्याचा आणि लोकशाही राजवटीत सर्वत्र संचार करण्याचा अधिकार आहे. मात्र, फिनिक्स मार्केटसिटी मॉलच्या व्यवस्थापनाने तृतीयपंथी व्यक्तीला मॉलमध्ये प्रवेश नाकारून तिच्या माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारावर आणलेले बंधन चुकीचे आणि माणुसकीला काळीमा फासणारे आहे. मॉल व्यवस्थापनाच्या वागणुकीमुळे तृतीयपंथीयांच्या सन्मानाला धक्का पोहोचला असून त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. संपूर्ण समाजाने  तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात सामावून घेतले पाहिजे आणि त्यांना त्यांचे अधिकार मिळवून दिले पाहिजे, असे आवाहन देखील भगवान वैराट यांनी यावेळी केले. 

Web Title: Phoenix mall welcomed transgenders by giving floral bouquets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.