बोर्डांच्या स्पर्धेतून वाढतोय विद्यार्थ्यांच्या गुणांचा टक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 08:00 AM2019-05-10T08:00:00+5:302019-05-10T08:00:02+5:30

आपल्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे विशेषत: अकरावी तसेच बारावीनंतरच्या इतर प्रवेशाचे मार्ग सुकर व्हावेत यासाठी हा गुणांचा फुगवटा तयार केला जात असल्याची भीती शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

The percentage of students increasing from board competition | बोर्डांच्या स्पर्धेतून वाढतोय विद्यार्थ्यांच्या गुणांचा टक्का

बोर्डांच्या स्पर्धेतून वाढतोय विद्यार्थ्यांच्या गुणांचा टक्का

Next
ठळक मुद्देअकरावी व इतर प्रवेशासाठीचा तिढा : खरं मुल्यमापनच होईना, प्रत्येक शाळेत बारावीपर्यंतचे वर्ग सुरू व्हावेतशाळांच्या शंभर टक्के निकालाच्या निकषाचाही पुनर्विचार व्हावा

दीपक जाधव
पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), द कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्ड (आयसीएसई), महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ (एसएससी) व इतर आंतर राष्ट्रीय मंडळ यांच्यात दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुणांची खैरात करण्याची स्पर्धा लागली आहे. आपल्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे विशेषत: अकरावी तसेच बारावीनंतरच्या इतर प्रवेशाचे मार्ग सुकर व्हावेत यासाठी हा गुणांचा फुगवटा तयार केला जात असल्याची भीती शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सीबीएसई पाठोपाठ आयसीएसई बोर्डाचे दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाले. एसएससी बोडार्चा बारावीचा निकाल मेच्या शेवटच्या आठवडयात तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवडयात लागणार आहे.  सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचे आकडे डोळे दिपवून टाकणारे होते. सीबीएसई बारावीच्या १७ हजार ६९३ विद्याार्थ्यांना ९५ टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. तर ९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्याार्थ्यांची संख्या ९४ हजार २९९ आहे. आयएससी बारावीच्या दोघा विद्यार्थ्यांना तर पूर्ण १०० टक्के गुण मिळाले. तिच परिस्थिती एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांची आहे, त्यांना मिळणाऱ्या कला व क्रीडा गुणांच्या २५ वाढीव गुणांमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत १०० टक्के गुण झळकत आहेत. 
सीबीएसईच्या परीक्षांची काठिण्यपातळी एसएससी बोडार्पेक्षा कमी असते, तसेच तसेच उत्तरपत्रिका तपासतानाही गुणांच्या बाबतही सढळ हात असतो त्यामुळे सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे गुण सर्रास अधिक असतात, अशी टिका शिक्षण वतुर्ळातून केली जाते. त्याला पर्याय म्हणून एसएससी बोडार्ने बेस्ट ऑफ फाइव्हचा पर्याय स्वीकारला. त्यामध्ये सर्वाधिक गुण मिळालेल्या पहिल्या ५ विषयांचेच मार्क गुणपत्रिकेत ग्राहय धरले जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या टक्क्यांचा आकडाच बदलून गेला. 
बोर्डांच्या स्पधेर्तून निर्माण झालेला हा गुणांच्या फुगवटा अकरावी प्रवेश व इतर प्रवेशांच्या तात्कालिक फायद्यासाठी उपयोगी ठरत असला तरी दिर्घकालीन विचार करता तो नुकसानकारक आहे. विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करण्याची पध्दतच सदोष करून टाकल्याने त्याचे फटके नंतरच्या काळात विद्यार्थ्यांना बसू लागले आहेत. ९० टक्क्यांच्या पुढे मार्क मिळाल्यामुळे हवेत गेलेले विद्यार्थी इंजिनिअरींग, मेडीकल अभ्यासक्रमांच्या परीक्षेला सामोरे जाताना पूर्णत: गडबडून जात असल्याचे तिथल्या प्राध्यापकांकडून सांगण्यात येत आहे.    
...........
आपापल्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळविताना अडचण येऊ नये यासाठी त्यांच्या गुणात वाढ होईल असे मुल्यमापन बोर्डांकडून केले जात आहे. अकरावी प्रवेशाचा तिढा सोडविल्यास बोर्डांकडून होत असलेला गुणांचा फुगवटा रोखता येऊ शकेल. सर्व बोर्डांनी त्यांच्या सर्व शाळांचे वर्ग १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करावेत. दहावी ज्या बोडार्तून उत्तीर्ण झाले त्याच बोडार्तून बारावी उत्तीर्ण झाले पाहिजे. अत्यावश्यक निकड असल्याशिवाय दहावीनंतर बारावीला बोर्ड बदलण्यास परवानगी देऊ नये. गुणवाढीच्या स्पर्धेत सर्वच बोर्ड सहभागी आहेत. त्यामुळे हे थांबवायचे असेल तर सर्वांनी एकत्र येऊन त्याबाबत निर्णय घ्यावे लागतील 
वसंत काळपांडे, शिक्षणतज्ज्ञ

शाळांच्या शंभर टक्के निकालाच्या निकषाचाही पुर्नविचार व्हावा
शाळांचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होणे याला चांगला निकाल म्हटले जाते. ज्या शाळेतील मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण कमी असते, त्या शाळांच्या अनुदानावरही परिणाम होतो. दहावीमध्ये शाळांचा १०० टक्के निकाल लावण्यासाठी ९ वीच्या वर्गातच अनेक विद्यार्थ्यांना नापास केले जात असल्याचे प्रकारही मोठयाप्रमाणात घडत आहेत. त्यामुळे शाळांचा दर्जा निश्चित करण्यासाठी १०० टक्के निकाल लागलाच पाहिजे असा ठरवलेल्या निकषाचाही पुर्नविचार करण्याची गरज आहे. 
 

Web Title: The percentage of students increasing from board competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.