शिवनेरीवर पारंपारिक पध्दतीने शिवजयंती उत्साहात साजरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 07:48 PM2018-03-04T19:48:20+5:302018-03-04T19:48:20+5:30

विविध कार्यक्रमांमधून छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी किल्ले शिवनेरीवर तिथीप्रमाणे मोठ्या उत्साहात व भारावलेल्या वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली. किल्ले शिवनेरीवर तिथीप्रमाणे साजऱ्या केल्या जाणाऱ्या शिवजयंती महोत्सवाचे हे ३९ वे वर्ष आहे.

people celebrated shivjaynati by Traditionally way on Shivneri fort | शिवनेरीवर पारंपारिक पध्दतीने शिवजयंती उत्साहात साजरी 

शिवनेरीवर पारंपारिक पध्दतीने शिवजयंती उत्साहात साजरी 

googlenewsNext
ठळक मुद्दे शिवाजी महाराजांनी अवघ्या ५० वर्षाच्या आयुष्यात देशाला पाच हजार वर्ष प्रेरणादायी बचतगटांच्या माध्यमातुन महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणाऱ्या गोळेगावच्या रेश्मा कोकणे यांना प्रदान

जुन्नर: शिवनेरीची गडदेवता शिवाई मातेला अभिषेक, त्यानंतर बालशिवबांच्या पुतळ्याची पालखीतून मंदिरापासून शिवजन्मस्थळापर्यंत पालखीतून काढण्यात आलेली मिरवणूक , पारंपारिक पद्धतीने पाळणा गीत म्हणत, पाळणा हलवून रंगलेला शिवजन्म सोहळा,शिवरायांच्या पराक्रमांचे वर्णन करणारे प्रेरणादायी पोवाडे गायन.ध्वजारोहण,अशा विविध कार्यक्रमांमधून छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी किल्ले शिवनेरीवर तिथीप्रमाणे मोठ्या उत्साहात व भारावलेल्या वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली. किल्ले शिवनेरीवर तिथीप्रमाणे साजऱ्या केल्या जाणाऱ्या शिवजयंती महोत्सवाचे हे ३९ वे वर्ष आहे.  याप्रसंगी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जागतिक युवा तत्वज्ञ परिषदेचे लक्ष्मीकांत पारनेरकर, शिवनेरी स्मारक समितीचे कार्याध्यक्ष मधुकर काजळे, शाहीर गणेश टोकेकर,नगराध्यक्ष शाम पांडे , जि प सदस्य गुलाब पारखे, रमेश खत्री , शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, जुन्नरचे , नगरसेवक समीर भगत , शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मकरंद पाटे,स्वराज्य मित्रमंडळाचे अध्यक्ष गोविंदराव हिंगे ,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा राजमाता जिजाऊ पुरस्कार बचतगटांच्या माध्यमातुन महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणाऱ्या गोळेगावच्या रेश्मा कोकणे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी झालेल्या प्रबोधनपर सभेत पारनेरकर पारनेरकर म्हणाले, शिवाजी महाराजांनी अवघ्या ५० वर्षाच्या आयुष्यात देशाला पाच हजार वषार्ची प्रेरणा देणारे कार्य केले आहे. 
  राज्याच्या विविध भागातून आलेले शिवप्रेमी उपस्थित होते. नारायणगाव ग्रामस्थांकडून शिवजन्म सोहळ्यासाठी प्रतिवर्षी बाळंतविडा पाठविण्यात येतो.या प्रथेचे हे २९ वे वर्ष आहे. देहू संस्थानच्या वतीने बाल शिवाजी आणि जिजाऊंना महावस्त्रे पाठविण्यात आली होती.

Web Title: people celebrated shivjaynati by Traditionally way on Shivneri fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.